Posts

Showing posts from August, 2026

आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित

Image
आदर्श पत्रकार पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित पुणे (बारामती) - एम.सी.एन न्यूज मराठीच्या वतीने देण्यात येणारा 'आदर्श पत्रकार पुरस्कार' पुणे जिल्हा प्रतिनिधी कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना देण्यात आला.एम.सी.एन न्यूज मराठीच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक,वैद्यकीय,पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला,त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे उपमुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्ष बारामती शहर कक्षप्रमुख,एम.सी.एन न्यूज मराठीचे पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार श्री.कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उद्घाटक श्री.शैलेश काळे (उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद), श्री.पवन पाटील (तहसीलदार), डॉ.सुरज जाधव (मुख्याधिकारी,नगरपरिषद जळगाव जामोद),ॲड.संदीप उगले,श्री.निलेश काळे,श्री.रमेश जाधव,श्री.अमोल चौधरी,डॉ.वाकेकर,श्री.संदीप देशमुख,डॉ.किशोर केला,श्री.सचिन तायडे,मुख्य संपादक शामभाऊ तायडे व संपादक राजुभाऊ वाढे यांच्या शुभहस्...

चौधरवाडी येथे श्री हनुमान मंदिर कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न. वीस वर्षांची प्रतीक्षा अखेर पूर्ण; माहेरवाशिनींच्या उपस्थितीने सोहळ्याला लाभली विशेष शोभा.

Image
चौधरवाडी येथे श्री हनुमान मंदिर कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न.  वीस वर्षांची प्रतीक्षा अखेर पूर्ण; माहेरवाशिनींच्या उपस्थितीने सोहळ्याला लाभली विशेष शोभा. सोमेश्वरनगर प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील चौधरवाडी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या कलश स्थापना सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तब्बल वीस वर्षांपूर्वी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते; मात्र काही अडचणींमुळे मंदिरावर कलश स्थापना करण्याचे काम प्रलंबित राहिले होते. अखेर श्रावणमासातील पवित्र आणि भक्तिमय वातावरणाचा योग साधत चौधरवाडी ग्रामस्थांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला. कलश स्थापना सोहळा ह.भ.प. बालब्रह्मचारी देवेन्द्रजी महाराज निढाळकर (डोणजे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी विधिवत पूजा, होम-हवन व धार्मिक विधी श्री. प्रभाकर पांडुरंग बोकील काका, सोमेश्वर-करंजे, पुरोहित व वेदशास्त्र तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मंगल सोहळ्यासाठी चौधरवाडी गावातील सर्व माहेरवाशिनींना गावाच्या वतीने विशेष निमंत्रण द...

सोमेश्वर विद्यालयातील सण १९९४-९५ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.

Image
सोमेश्वर विद्यालयातील सण १९९४-९५ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न. सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालयातील सण १९९४-९५ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा रविवार ३० ऑगस्ट रोजी संपन्न. या स्नेह मेळाव्यात विद्यार्थिनींची संख्या अधिकची होती. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत जात व त्या वर्गातील बेंचवर बसत जुन्या आठवणींना उजाळा दिला. चहा चा आस्वाद घेत प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले मुलांची संख्या कमी असून आम्हा मुलींची संख्या जास्त असल्याचे सतत टोमणे दिले या टोमण्यांना प्रतिसाद देत  तुम्ही एकत्र आलात गप्पा गोष्टी झाल्यात यातच आम्हाला समाधान असल्याची सारवासारव उपस्थित काही जणांनी केली.आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात सर्वत्र फिरत आनंद व समाधान वाटले. आपल्या बॅचच्या माध्यमातून सोमेश्वर विद्यालयास दिलेला पिण्याच्या पाण्याचा फिल्टर व फिल्टरचे शुद्ध पाणी आज सुद्धा शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळते याबद्दल समाधान व्यक्त केले. सकाळी काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रवास केल्याने पोटात कावळे काव कव करत होते त्यामुळे ...

CRIME NEWS लाखो रुपये किमतीची देशी व गावठी दारू जप्त.. माळेगाव पोलिसांची धडक कारवाई.

Image
CRIME NEWS लाखो रुपये किमतीची देशी व गावठी दारू जप्त.. माळेगाव पोलिसांची धडक कारवाई. बारामती/माळेगाव - अवैध दारू वाहतुकीच्या गाडीवर माळेगाव पोलीसांची धडक कारवाई करून ४ लाख ४६ हजार ५०० रू किंमतीची देशी तसेच गावठी हातभट्टीची दारू जप्त तसेच दोन आरोपी ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी माळेगाव पोलीस स्टेशन ह‌द्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते. तसेच पुणे जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी आणली जात असल्याने अशा दारू वाहतूकदारांची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे २१:३० वाजता, माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास साळवे तसेच पोलीस अंमलद...
Image
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार बारामती : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकासकामे निर्धारित वेळेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांना दिल्या. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सकाळी ६ वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. तब्बल २.९६ एकर परिसरात ३४ कोटी ६७ लाख ७ हजार ४३३ रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले हे क्रीडा संकुल खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा आणि उत्तम क्रीडा वातावरण उपलब्ध करून देणारे ठरणार असल्याचे ...
Image
CRIME NEWS इन्स्टाग्रामवरील "आभासी भाईगिरी" पडली महागात; तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये सुपा पोलिसांची धडक कारवाई! सुपा: सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हातात घातक शस्त्रे घेऊन 'रील' (Reel) बनवणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या प्रवृत्तींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी (सुपा पोलीस ठाणे) कायदेशीर बडगा उगारला आहे. पोलिसांच्या 'सायबर पेट्रोलिंग' पथकाने इंस्टाग्रामवरील एका प्रक्षोभक व्हिडिओची गंभीर दखल घेत एका तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यासह गंभीर कलमांन्वये थेट गुन्हा दाखल केला आहे. नेमका प्रकार काय? सुपा पोलीस ठाण्याचे 'सायबर मॉनिटरिंग' पथक गस्तीवर असताना, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी 'prem_jagtap_0295' या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी (ता. बारामती) येथील रहिवासी प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन व्हिडिओ पोस्ट केल्याचे आढळून आले. सदर व्हिडिओवर "आलीशान युवा प्रतिष्ठान" असा मजकूर टाकून, "शांत है इसका मतल...

बारामतीतील हरिभाऊ देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याचे बॅडमिंटन स्पर्धेत यश

Image
बारामतीतील हरिभाऊ देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्याचे बॅडमिंटन स्पर्धेत यश मुख्य संपादक विनोद गोलांडे ... बारामती - जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मधील १३ वर्ष वयोगटातील विद्यार्थी चि.वरद दिनेश चितळे याने उत्कृष्ट कामगिरी करत सिंगल बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तसेच अंडर १५ डबल्स या प्रकारात ही प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित, महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी, मएसो क्रीडावर्धिनी शाळा समन्वयक शैलैश आपटे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Image
बारामती !  “माझा गट, माझं कुटुंब” या भावनेतून मातीच्या लेकी शेतकरी गटाचा स्नेहमेळावा. बारामती : “माझा गट, माझं कुटुंब” या भावनेतून मातीच्या लेकी शेतकरी गटाचा स्नेहमेळावा व फार्म फिस्टा कार्यक्रम ऋणिता चव्हाण यांच्या उडीद पिकाच्या प्लॉटवर उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी सेंद्रिय उडीद पिकाची पाहणी, कामगंध व चिकट सापळे, पक्षी थांबे आदी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, सहाय्यक कृषी अधिकारी विजय गोफणे, विनोद गोफणे, धुमाळ, पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गटातील ११ महिला सदस्यांनी सहभाग घेतला. विविध खेळ, पतंग उडवणे, गप्पा, फोटोसेशन व सामुदायिक भोजनातून कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 
Image
बारामती - देहदानाला वैद्यकीय शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून देहदात्यांच्या योगदानामुळे भावी डॉक्टरांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष व सखोल अभ्यास करता येतो. देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ अंजली पाटील यांनी केले. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात देहदान करणाऱ्या कुटुंबीयांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार उपस्थित होते.        यावेळी बिरादार यांनी देहदान व अवयवदानाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करत समाजात व्यापक जनजागृती करुन अधिकाधिक नागरिकांनी या महान कार्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. डॉ. गीतांजली सुडके यांनी देहदानातून वैद्यकीय शिक्षण, संशोधन तसेच देहदानाची आजच्या काळाची गरज या विषयी सविस्तर विश्लेषण केले, तर डॉ. सुरज जाधवर यांनी अवयवदानातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या जीवनदानाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी देहदान...

मु. सा. काकडे महाविद्यालयात हर घर तिरंगा उपक्रम उत्साहात साजरा

Image
मु. सा. काकडे महाविद्यालयात " हर घर तिरंगा " उपक्रम उत्साहात साजरा (मुख्य संपादक विनोद गोलांडे) सोमेश्वरनगर (ता. बारामती) : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय प्राचार्यांनी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना देश सेवेबद्दल तसेच सैनिकांनी देशासाठी केलेले बलिदान तसेच देशाप्रती त्यांनी केलेल्या शौर्याची आठवण उपस्थितांना करून दिली आणि बारामती तालुक्यातील माजी सैनिकांचा महाविद्यालयामध्ये सत्कार करून त्यांच्या देशसेवेच्या कार्याचे कौतुक करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करावी असे आव्हान केले यावेळी ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ या संकल्पनेवर विद्यार...

CRIME NEWS वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ सराईत गुन्हेगार जेरबंद..एकूण ११ लाख ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Image
CRIME NEWS वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ सराईत गुन्हेगार जेरबंद. एकूण ११ लाख ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त सोमेश्वरनगर - पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने जबरी चोरी व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानडवाडी परिसरातील एका महिलेकडील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जबरी चोरी व दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत राज मिशुन शिंदे, सनी रमण भोसले, पवन संडल काळे आणि बापूराव भाऊदास चोपडे यांना अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान वडगाव ...

हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Image
हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.  बारामती प्रतिनिधी  देशभक्तीच्या जल्लोषात हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा  उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थित प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याप्रति अभिमानाची आणि राष्ट्र प्रेमाची ज्योत प्रज्वलित केली.        कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे, माजी सैनिक मा. श्री. नंदकुमार दत्तात्रेय पिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री. पी. बी. कुलकर्णी सर तसेच मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी एकसुरात राष्ट्रगीताचे गायन केले. यानंतर शिक्षकांनी झेंडा गीत आणि राज्यगीताचे गायन क...

स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण बारामती :भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन्य कदम, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, उपअधीक्षक भुमीअभिलेख संजय घोंगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, नगरसेवक, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.श्री. दिघे यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

अनुदानासह ४,०००/- रुपये प्र.मे.टन एवढा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहिर करणारा सोमेश्वर ठरला राज्यातील पहिला कारखाना.

Image
अनुदानासह ४,०००/- रुपये प्र.मे.टन एवढा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहिर करणारा सोमेश्वर ठरला राज्यातील पहिला कारखाना. सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२५-२०२६ गाळप हंगामाकरीता राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदानासह प्रति मे.टन रु.४,०००/- असा ऐतिहासीक उच्चांकी ऊसदर जाहिर करणारा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना ठरला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.३,८००/-, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.३,९००/- व मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.४,०००/- एवढा सर्वोच्च असा ऐतिहासीक ऊसदर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहिर केल्याची माहिती श्री. जगताप यांनी दिली. संपुर्ण राज्यात एफ.आर.पी. पेक्षा प्र.मे.टन ...

अनुदानासह ४,०००/- रुपये प्र.मे.टन एवढा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहिर करणारा सोमेश्वर ठरला राज्यातील पहिला कारखाना

Image
अनुदानासह ४,०००/- रुपये प्र.मे.टन एवढा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहिर करणारा सोमेश्वर ठरला राज्यातील पहिला कारखाना. सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२५-२०२६ गाळप हंगामाकरीता राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदानासह प्रति मे.टन रु.४,०००/- असा ऐतिहासीक उच्चांकी ऊसदर जाहिर करणारा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना ठरला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.३,८००/-, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.३,९००/- व मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.४,०००/- एवढा सर्वोच्च असा ऐतिहासीक ऊसदर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहिर केल्याची माहिती श्री. जगताप यांनी दिली. संपुर्ण राज्यात एफ.आर.पी. पेक्ष...

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

Image
इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश. ** जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश; ** शैक्षणिक पात्रता, नोंदणी कागदपत्रांची पडताळणी होणार ——————————————————————— इंदापूर :                      इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या १६ रुग्णालयांच्या नोंदणी अथवा नूतनीकरणाच्या प्रक्रियेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या सर्व रुग्णालयांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती इंदापूर यांना दिले आहेत. संबंधित चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत.                      सुधाकर तुकाराम बोराटे यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने ही कार्यवाही केली आहे. तक्रारीनुसार...

संशयिताकडून १९ दुचाकी हस्तगत, तब्बल १९ गुन्हे उघडकीस ,बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Image
संशयिताकडून १९ दुचाकी हस्तगत, तब्बल १९ गुन्हे उघडकीस ,बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई बारामती : बारामती शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बारामती पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या तब्बल १९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. बारामती : बारामती शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बारामती पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीच्या तब्बल १९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अ...

बापू शिंदे यांचे दुःखद निधन.

Image
बापू शिंदे यांचे दुःखद निधन. सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे   येथील बापूर साधू शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले, ते ८५ वर्षांचे होते ,त्यांच्या विवाहित तीन मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. पुणे शहर पोलीस कर्मचारी गणेश शिंदे यांचे ते वडील होत.

हनुमंत चांदगुडे यांच्या ‘आडतास’ला विद्यापीठाची मोहोर; एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश

Image
हनुमंत चांदगुडे यांच्या ‘आडतास’ला विद्यापीठाची मोहोर; एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश सोमेश्वरनगर - सुपे (ता बारामती)येथील सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे यांच्या ‘आडतास’ या काव्यसंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुपेसह बारामतीच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमातील ‘साहित्यनिर्मिती प्रक्रिया, साहित्यनिर्मितीचे सिद्धांत-व्यवहार आणि स्वरूप’ या अभ्यासघटकासाठी ‘आडतास’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या काव्यसंग्रहातील ‘लेक’ या कवितेचा यापूर्वीच एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

खळदच्या महाआरोग्य शिबिरात अवयवदाते कुटुंबाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

Image
खळदच्या महाआरोग्य शिबिरात अवयवदाते कुटुंबाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान बारामती : पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खळद येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात अवयवदाते सुबनावळ कुटुंबीयांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  मागील वर्षी इंदापूर तालुक्यातील कै. हिराबाई सुबनावळ यांचे ब्रेनडेड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र कैलास सुबनावळ यांनी अवयवदानासाठी सहमती दर्शविली. त्यांच्या या धाडसी आणि मानवतावादी निर्णयामुळे तब्बल पाच जणांना जीवनदान मिळाले. यावेळी कैलास सुबनावळ यांनी, “जळून राख होण्यापेक्षा आईला अवयवदानरूपी जिवंत ठेवले,” अशी भावना व्यक्त केली. इंदापूर तालुक्यातील एका छोट्या गावातील कुटुंबाने घेतलेला हा सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी निर्णय समाजासाठी आदर्श ठरत आहे.  या शिबिरात तब्बल ८ हजार ८८० लाभार्थींनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. शिबिरात तपासणीदरम्यान सुमारे २ हजार रुग्णांमध्ये विविध आजारांचे नि...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील विकासकामांची केली पाहणीमयुरेश्वर मंदिराचा पुरातन वारसा जपत दर्जेदार कामे करा ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Image
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील विकासकामांची केली पाहणी मयुरेश्वर मंदिराचा पुरातन वारसा जपत दर्जेदार कामे करा ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश बारामती : श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित ठेवून आधुनिक सुविधांचा समन्वय साधावा. मंदिर परिसरातील विकास व जीर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसार दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिल्या. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती घेतली. श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर परिसरातील कामांचा आढावा घेताना श्रीमती पवार म्हणाल्या, मंदिराच्या जिर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसारच करण्यात यावीत. मंदिर परिसर आणि गाभाऱ्यातील स्वच्छतेला सर्वोच्च प्...

15011 Cusecs इतका विसर्ग निरा नदीपात्रात सुरू, सावधानतेचा इशारा.

Image
15011 Cusecs इतका विसर्ग निरा नदीपात्रात सुरू, सावधानतेचा इशारा. सावधानतेचा इशारा l वीर धरण, ता. पुरंदर, पुणे दिनांक 08/08/2026 रोजी वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग वाढवून 13911 Cusecs व अतिवाहका द्वारे 1100 Cusecs असा एकूण 15011 Cusecs इतका विसर्ग निरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.

"भारतीय युवा पँथर संघटनेचा पाचवा वर्धापन दिन " पीडित, शोषित आणि वंचितांच्या न्यायासाठी पाच वर्षांचा संघर्षमय प्रवास

Image
भारतीय युवा पँथर संघटनेचा पाचवा वर्धापन दिन पीडित, शोषित आणि वंचितांच्या न्यायासाठी पाच वर्षांचा संघर्षमय प्रवास बारामती प्रतिनिधी l पीडित, शोषित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी आणि अन्यायाविरोधात संघर्ष करण्याच्या उद्देशाने भारतीय युवा पँथर संघटनेने आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. आज संघटनेचा पाचवा वर्धापन दिन साजरा होत असून, गेल्या पाच वर्षांच्या सामाजिक वाटचालीकडे पाहताना संघटनेच्या कार्याचा निश्चितच अभिमान वाटतो. सामाजिक कार्याची आवड आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक भावना मनात ठेवून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी भारतीय युवा पँथर संघटनेची स्थापना केली. अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळवून देणे, गरजूंच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि समाजातील वंचित घटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, हा संघटनेच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत संघटनेने विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविताना पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले आहे. अन्याय, शोषण, भे...

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

Image
श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.  सोमेश्वरनगर प्रतिनिधी l बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान आहे . श्रावणमास सुरुवात गुरुवार दि 13 रोजी सुरू होणार असून श्रावण महिन्यामध्ये प्रतिसोरिटी सोमनाथाचे प्रति रूप मानले जाणारे करंजे-देऊळवाडी येथील श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग आहे. स्वयंभू शिवलिंग चे दर्शन घेण्यासाठी विविध जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून शिवभक्त भाविक येत असतात.  श्रावण महिन्यानिमित्त सोमेश्वर मंदिर हद्दीत दर वर्षी प्रमाणे दुचाकी ,चार चाकी  पार्किंग साठी जागा व त्या संदर्भात लिलाव ( डिपॉझिट स्वरूपात 500 रुपये) आकारले जातील उद्या रविवार दिनांक 9 /8/2026  रोजी सध्यकाळी 4 वाजता सोमेश्वर मंदिर मध्ये हा निलाव होणार असून सोमेश्वर पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकारी व इच्छुक ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवावा असे नम्र आवाहन देवस्थान ट्रस्ट यांनी माहिती देत केली.

कै. बाबालाल साहेबराव काकडे - देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

Image
कै. बाबालाल साहेबराव काकडे - देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन  सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१ / ०८ / २०२६ ते ०४ / ०८ / २०२६ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. दि. ०१/०८/२०२६ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि संधी' या विषयावर प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी विचार मांडले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. ही एक संधी असून विद्यार्थ्यांना या धोरणानुसार अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. विद्याशाखेचे बंधन जुगारून वेगवेगळ्या विद्याशाखेतील विषय विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी निवडता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने जे बदल उच्च शिक्षणामध्ये येणार आहेत याची सोदाहरण मांडणी त्यांनी आपल्या व्याख्यानातून केली. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ.संजू जाधव यांनी मानले. दि. ०३ / ०८ / २०२६ रोजी व्याख्यानमालेच्या दुसरा दिवस कै. बाबालाल काकडे देशमुख यांचा स्मृतिदिन. य...