स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती :भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन्य कदम, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, उपअधीक्षक भुमीअभिलेख संजय घोंगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय, नगरसेवक, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.श्री. दिघे यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारुन सर्व उपस्थित मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 


Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

अनुदानासह ४,०००/- रुपये प्र.मे.टन एवढा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहिर करणारा सोमेश्वर ठरला राज्यातील पहिला कारखाना.