Posts

Showing posts from March, 2026

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे

Image
आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे  कालकथित लक्ष्मीबाई शंकर धिवार यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा. सासवड (प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे मूळ गाव खानवडी येथील रहिवासी आणि बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांच्या मातोश्री कालकथित लक्ष्मीबाई शंकर धिवार यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन राष्ट्रीय समाज प्रबोधन कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या समाज प्रबोधन रुपी किर्तन सेवेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्मातील सूत्तपठणाचा विधी पार पाडण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ह.भ.प .ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापुरुषांच्या घोषणांचा जय घोष करण्यात आला. महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त...