Posts

Showing posts from October, 2026

"सोमेश्वर कारखान"'च्या मतमोजणी प्रक्रियेत पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे ५७ मतांनी विजयी.

Image
"सोमेश्वर कारखान"'च्या मतमोजणी प्रक्रियेत  पहिला निकाल सुनेत्रा पवार यांच्या पॅनलच्या बाजूने; संग्राम सोरटे ५७  मतांनी विजयी. सोमेश्वरनगर विनोद गोलांडे :  बारामती तालुक्यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पहिल्या निकालात अजितदादा पवार पॅनलचे संग्राम सोरटे विजयी झाले. त्यांनी महेश राणे यांचा ५७ मतांनी पराभव केला. 

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त करंजे ग्रामपंचायत वतीने अभिवादन.

Image
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त करंजे ग्रामपंचायत वतीने अभिवादन. सोमेश्वरनगर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बारामतीतील करंजे ग्रामपंचायत वतीने सरपंच भाऊसो हुंबरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  आयोजित कार्यक्रमात सरपंच भाऊसो हुंबरे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, सुनील केंजळे सह कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
Image
सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक....कोऱ्हाळे खुर्दमध्ये अजितदादा गटाच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद. पक्षनिष्ठा आणि स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा; विद्यमान संचालिका प्रणिता खोमणे भावूक सोमेश्वरनगर : प्रतिनिधी (विनोद गोलांडे) बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांकडून गावभेटी आणि सभांचा धडाका सुरू असताना चार नंबर गटातील कोऱ्हाळे खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या वतीने सभासद व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यमान संचालिका तथा माजी व्हाईस चेअरमन प्रणिता मनोज खोमणे यांनी पक्षनिष्ठा आणि स्वर्गीय अजितदादांशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला. अजितदादांनी सोमेश्वर कारखान्यात संचालक तसेच व्हाईस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करून सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान काही सभासदांनी प्रणिता खोमणे यांच्या कामाचा उल्लेख करत त्यांना आगामी निवडणुकीसाठी...