Baramati News बारामती तालुक्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत १०० टक्के डिजिटल मॅपिंग पूर्ण
Baramati News बारामती तालुक्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत १०० टक्के डिजिटल मॅपिंग पूर्ण बारामती : विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) मोहिमेअंतर्गत मतदार पडताळणी व डिजिटल मॅपिंगचे काम बारामती तालुक्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी मुदतीपूर्वीच शंभर टक्के पूर्ण केले आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल कळसकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सातत्याने आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले. तांत्रिक बाबींवरील तत्पर सहाय्य, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळे संबंधित बीएलओंना उद्दिष्ट मुदतीपूर्वी पूर्ण करणे शक्य झाले. या मोहिमेत रणजित दिलीप ननवरे (यादी भाग क्र. ३), पोपट गुलाबराव कोकरे (भाग क्र. ३५), विलास महादेव देवकाते (भाग क्र. १०२), विशाल धुळे (भाग क्र. २४६), गणेश अरुण गायकवाड (भाग क्र. २५३), प...