बारामती ! वारकऱ्यांच्या सेवेकरिता पंचायत समिती सज्ज-गट विकास अधिकारी किशोर माने
बारामती ! वारकऱ्यांच्या सेवेकरिता पंचायत समिती सज्ज-गट विकास अधिकारी किशोर माने
बारामती - बारामती दि. १३: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे १४ जुलै रेाजी तसेच श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे १७ जुलै रोजी बारामती तालुक्यात आगमन होणार आहे, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेकरिता पंचायत समितीच्यावतीने आवश्यक ती पूर्वतयारी केली असून पालखीच्या स्वागताकरिता प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी किशोर माने यांनी दिली आहे.
तालुक्यात वारकऱ्यांच्या सेवेकरिता २०० कर्मचारी अधिकारी, ७४ पाणी टॅंकर, ३ ठिकाणी टँकर भरण्याची सुविधा, उंडवडी सुपे १२, उंडवडी कप ६, बऱ्हाणपूर १८ ठिकाणी विहीरींचे शुद्ध पाणीपुरवठाकरिता पाणी शुद्धीकरणत तसेच पाणी नमुने तपासणी करण्याची सुविधा करण्यात आली आहे.
वारकरी निवाऱ्यांच्यादृष्टीने उंडवडी सुपे येथे २ आणि खराडेवाडी येथे १ असे ३ जर्मन हॅंगर तसेच उंडवडी सुपे येथे २ आणि बऱ्हाणपूर १ येथे जलरोधक मंडप उभारण्यात आले आहेत. खराडेवाडी, उंडवडी सुपे, उंडवडी कप आणि बऱ्हाणपूर यामध्ये येथे विसावा चबुतरा मंडप सजावट, चरणसेवा कक्ष,आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, नियत्रंण कक्ष, अतिदक्षता कक्ष, सुमारे १ हजार २०० शौचालये, या वर्षी नव्याने १५० स्नानगृहे, स्नानगृहे आडोसा, डास डास कीटक प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी सुविधा आहेत.
पालखी तळ स्वच्छता सपाटीकरण तसेच तात्पुरती कचरा कुंडी, मुतारीची व्यवस्था करण्यात आली आहे. दिंडी मुक्काम ठिकाणी किरकोळ रस्ता दुरूस्ती तसेच विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. माने यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment