तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.

सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे)
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठान्स सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
 तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ मधील कुस्ती स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली तनुष्का शिवाजी भुजबळ, इयत्ता १० वी, १७ वर्षांखालील गटातील ५७ किलोपेक्षा कमी वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले,समृद्धी प्रविण सावंत, १४ वर्षांखालील गटातील ३० किलोपेक्षा कमी वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाची मानकरी ठरली.या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २०२६ जिल्हा क्रीडा संकुल, बारामती नुकत्याच झालेल्या  तायक्वांदो स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली यामध्ये तन्मय रेवन्नाथ होळकर, इयत्ता ९ वी, १७ वर्षांखालील गटातील ६८ ते ७३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.ज्ञानेश्वरी जगताप, इयत्ता १० वी ‘ब’, १७ वर्षांखालील गटातील ४६ ते ४९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले असल्याने तन्मय होळकर व ज्ञानेश्वरी जगताप या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच राजलक्ष्मी जगताप, इयत्ता १० वी, १७ वर्षांखालील गटातील ५२ ते ५५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक प्राप्त केले विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य  सचिन पाठक यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका सौ. उर्मिला मचाळे व क्रीडा शिक्षक  रणजित देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.