गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.
गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ४ इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
सुपा पोलीस ठाणेकडून सादर करण्यात आलेल्या हद्दपार प्रस्ताव क्र. ०१/२०२५ अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी दिनांक २१/०९/२०२६ रोजी आदेश पारित करून खालील इसमांना २४ महिने (२ वर्षे) कालावधीसाठी संबंधित हद्दीतून हद्दपार केले आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे.
1. वैभव तुकाराम शेलार, वय ३२ वर्षे, रा. नाईकवाडी, मगरवाडी, ता. बारामती, जि. पुणे.
2. किरण मारुती गायकवाड, वय २५ वर्षे, रा. नाईकवाडी, मगरवाडी ता. बारामती, जि. पुणे.
3. अनिकेत प्रदीप काळे, वय २८ वर्षे, रा. देऊळवाडी, करंजे, ता. बारामती, जि. पुणे.
4. अमोल पोपट गायकवाड, वय ३४ वर्षे, रा. गायकवाडवस्ती, मगरवाडी ता. बारामती, जि. पुणे.
सदर इसमांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अभिलेखाचा विचार करून तसेच सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपारीचा कालावधी व क्षेत्र
सदर इसमांना २४ महिन्यांसाठी (२ वर्षे) पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व हवेली तालुके, तसेच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह, तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका या हद्दीबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. Tadipar order supa.pdf
हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून संबंधित हद्दीत प्रवेश केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
— पुणे ग्रामीण पोलीस
Comments
Post a Comment