Posts

Showing posts from November, 2026
Image
नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने ५० हजारांची फसवणूक; आरोपीस अटक. बँकेतून पैसे काढून घरी जात असताना हातचलाखीने लंपास केली रक्कम; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई. सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : दिवाळी सणानिमित्त बँकांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना, याचाच फायदा घेत नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने एका नागरिकाची ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोमेश्वरनगर येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून दिवाळीच्या खरेदीसाठी ५५ हजार रुपये काढून घरी जात होते. बँकेत पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसली होती. त्यानंतर फिर्यादी दुचाकीवरून घरी जात असताना संबंधित व्यक्ती काळ्या रंगाच्या मोपेडवरून त्यांच्या जवळ आली. तुमच्या खिशातील नोटा खराब आहेत, त्या बदलून तुम्हाला चांगल्या नोटा देतो, असे सांगून त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ५० हजार रुपयांची रक्कम हातात घेऊन नोटा बदलून देण्याच्या बहाण्य...
Image
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची सोमेश्वर कारखान्याला भेट; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन. नवनिर्वाचित चेअरमन राजवर्धन शिंदे, व्हाईस चेअरमन संग्राम सोरटे यांच्यासह संचालकांना दिल्या शुभेच्छा; विविध विषयांवर चर्चा. सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे, उपाध्यक्ष संग्रामभाऊ सोरटे तसेच सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान कारखान्याच्या कामकाजासह आगामी गाळप हंगाम, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, कारखान्याची प्रगती आणि भविष्यातील नियोजन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कारखान्याचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या भेटीमुळे कारखान्याच्या आगामी वाटचालीसंदर्भात चर्चा झाली.
Image
अध्यक्षपदावर राजवर्धन शिंदे यांची हॅट्ट्रिक; संग्राम सोरटे यांना दुसऱ्या टर्ममध्ये उपाध्यक्षपदाची संधी अनुभवी नेतृत्व आणि युवा चेहऱ्याचा संगम; सुनेत्रा पवार यांचा जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी गुरुवारी (दि. ५) पार पडल्या. कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची निवड झाली. शिंदे यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने त्यांनी अध्यक्षपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. तर दुसऱ्या टर्ममध्ये संचालक मंडळात आलेल्या संग्राम सोरटे यांना उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे. सोमेश्वर कारखान्याची यंदाची पंचवार्षिक निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. एकीकडे उच्चांकी ऊसदरामुळे कारखाना चर्चेत असतानाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक होती. निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचे निशाण फडकाव...
Image
शाळेत ये-जा करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; धमकावून ठेवले दहशतीखाली! मुलगी गर्भवती झाल्यानंतर गंभीर प्रकार उघडकीस; निरगुडवाडीतील आरोपीस वडगाव निंबाळकर पोलिसांकडून अटक सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी निरगुडवाडी (ता. बारामती) येथील सतीश मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही ती शाळेत ये-जा करत असताना रस्त्यात अडवून तिच्याकडे मैत्रीची मागणी केली. मुलीने नकार दिल्यानंतर तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला स्वतःच्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्...