उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची सोमेश्वर कारखान्याला भेट; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन.
नवनिर्वाचित चेअरमन राजवर्धन शिंदे, व्हाईस चेअरमन संग्राम सोरटे यांच्यासह संचालकांना दिल्या शुभेच्छा; विविध विषयांवर चर्चा.
सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे, उपाध्यक्ष संग्रामभाऊ सोरटे तसेच सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान कारखान्याच्या कामकाजासह आगामी गाळप हंगाम, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, कारखान्याची प्रगती आणि भविष्यातील नियोजन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कारखान्याचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या भेटीमुळे कारखान्याच्या आगामी वाटचालीसंदर्भात चर्चा झाली.
Comments
Post a Comment