शाळेत ये-जा करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; धमकावून ठेवले दहशतीखाली!


मुलगी गर्भवती झाल्यानंतर गंभीर प्रकार उघडकीस; निरगुडवाडीतील आरोपीस वडगाव निंबाळकर पोलिसांकडून अटक

सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी निरगुडवाडी (ता. बारामती) येथील सतीश मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही ती शाळेत ये-जा करत असताना रस्त्यात अडवून तिच्याकडे मैत्रीची मागणी केली. मुलीने नकार दिल्यानंतर तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला स्वतःच्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), ६५(१), ७८, ३५१(२), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.