Baramati News बारामती तालुक्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत १०० टक्के डिजिटल मॅपिंग पूर्ण

Baramati News बारामती तालुक्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत १०० टक्के डिजिटल मॅपिंग पूर्ण
बारामती : विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) मोहिमेअंतर्गत मतदार पडताळणी व डिजिटल मॅपिंगचे काम बारामती तालुक्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी मुदतीपूर्वीच शंभर टक्के पूर्ण केले आहे.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल कळसकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सातत्याने आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले. तांत्रिक बाबींवरील तत्पर सहाय्य, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळे संबंधित बीएलओंना उद्दिष्ट मुदतीपूर्वी पूर्ण करणे शक्य झाले.
या मोहिमेत रणजित दिलीप ननवरे (यादी भाग क्र. ३), पोपट गुलाबराव कोकरे (भाग क्र. ३५), विलास महादेव देवकाते (भाग क्र. १०२), विशाल धुळे (भाग क्र. २४६), गणेश अरुण गायकवाड (भाग क्र. २५३), पुष्पा मधुकर वाबळे (भाग क्र. ३४९), सुनिल रघुनाथ घाडगे (भाग क्र. ३६६) आणि सोमनाथ नारायण वाघमोडे (भाग क्र. ३७२) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांची पडताळणी, माहिती संकलन, ऑनलाइन नोंदणी व डिजिटल मॅपिंगचे काम शंभर टक्के पूर्ण केले.
नियमित शासकीय जबाबदाऱ्यांसह विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेतील कर्तव्य पार पाडताना संबंधित बीएलओंनी दुर्गम भागांतील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन माहिती संकलित केली. ऑनलाइन अर्जांची पूर्तता, माहितीची पडताळणी व वेळेत डिजिटल मॅपिंग करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केले. स्थानिक नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे हे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते संबंधित बीएलओंना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रीय कर्तव्याप्रती दाखविलेली निष्ठा, समर्पित सेवा व उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या यशामुळे विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीस बळकटी मिळाली असून इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

वारकरी यांना औषधाचे किट मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शुभहस्ते दिडी प्रमुखांना वाटप केले बाबत.

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे