खोटा गुन्हा दाखल होईल अशी भीती व धमकी देत हजारो रुपये खंडणी उकळले प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

खोटा गुन्हा दाखल होईल अशी भीती व धमकी देत हजारो रुपये खंडणी उकळले प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.

सोमेश्वरनगर - मिळालेल्या माहितीनुसार नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर याने स्वतःचा पोलीसांशी सबंध असल्याचे फिर्यादीस खोटे भासवून, फिर्यादीवर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकीत करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याबाबत खोटा गुन्हा दाखल होईल, झाला आहे व फिर्यादीला अटक होईल अशी फिर्यादी- विजय हिंदुराव साळुंखे वय 36वर्षे, रा.वाघळवाडी भीती दाखवून,धमकी देवुन फिर्यादीकडून 12,000/- रुपये खंडणी स्वरुपात उकळले आहे. तसेच पुन्हा पैशांची मागणी करून धमकी दिली आहे. व फिर्यादीकडुन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत आहे.वगैरे मजकुराचे दिले फिर्यादीवरून विनोद नामदास रा.विकासनगर,वाणेवाडी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(६)(७), ३५१(२)(३) व ३१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे.
पुढील तपास वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय दीपक वारुळे व पोलीस हवालदार पन्हाळे हे करत आहे.

Comments

Popular posts from this blog

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

वारकरी यांना औषधाचे किट मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शुभहस्ते दिडी प्रमुखांना वाटप केले बाबत.

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे