सोमेश्वर विद्यालयातील सण १९९४-९५ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.

सोमेश्वर विद्यालयातील सण १९९४-९५ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालयातील सण १९९४-९५ च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा रविवार ३० ऑगस्ट रोजी संपन्न. या स्नेह मेळाव्यात विद्यार्थिनींची संख्या अधिकची होती. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत जात व त्या वर्गातील बेंचवर बसत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
चहा चा आस्वाद घेत प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले मुलांची संख्या कमी असून आम्हा मुलींची संख्या जास्त असल्याचे सतत टोमणे दिले या टोमण्यांना प्रतिसाद देत  तुम्ही एकत्र आलात गप्पा गोष्टी झाल्यात यातच आम्हाला समाधान असल्याची सारवासारव उपस्थित काही जणांनी केली.आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात सर्वत्र फिरत आनंद व समाधान वाटले. आपल्या बॅचच्या माध्यमातून सोमेश्वर विद्यालयास दिलेला पिण्याच्या पाण्याचा फिल्टर व फिल्टरचे शुद्ध पाणी आज सुद्धा शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळते याबद्दल समाधान व्यक्त केले. सकाळी काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रवास केल्याने पोटात कावळे काव कव करत होते त्यामुळे
 हॉटेलमध्ये जात शाकाहारी जेवणावर मस्त ताव मारला आणि नंतर थंडगार आईस्क्रीम खात शांत झालो आणि पुढील प्रवासात सज्ज झालो.. मग काय....
श्रावण महिना असल्याने करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शन घेतले. काही माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी पाळण्यात बसण्याचा आनंद तर कोणी फुगे फोडले आणि यात्रेचा मनसोक्त आनंद घेतला.




Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.