मु. सा. काकडे महाविद्यालयात हर घर तिरंगा उपक्रम उत्साहात साजरा
मु. सा. काकडे महाविद्यालयात " हर घर तिरंगा " उपक्रम उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर (ता. बारामती) : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग तसेच संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय प्राचार्यांनी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना देश सेवेबद्दल तसेच सैनिकांनी देशासाठी केलेले बलिदान तसेच देशाप्रती त्यांनी केलेल्या शौर्याची आठवण उपस्थितांना करून दिली आणि बारामती तालुक्यातील माजी सैनिकांचा महाविद्यालयामध्ये सत्कार करून त्यांच्या देशसेवेच्या कार्याचे कौतुक करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करावी असे आव्हान केले
यावेळी ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. तसेच सैनिक कल्याण संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘Experience of Army Life’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. माजी सैनिकांनी आपल्या सैनिकी जीवनातील अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा दिली.
कार्यक्रमास सैनिक कल्याण संघाचे प्रकाश कुर्डे,प्रशांत शेंडकर, विजय गोलांडे व दिलीप गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे, कार्यक्रमाला सी.डी.सी. अध्यक्ष अभिजीत काकडे-देशमुख, अध्यक्ष सतीशराव काकडे-देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी कॅप्टन डॉ. एस. टी. घाडगे, डॉ. ए. व्ही. लोंढे, डॉ. बी. एन. मरगजे व डॉ. संजू जाधव यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि व्यसनमुक्तीचा संदेश रुजविण्यात आला.
Comments
Post a Comment