CRIME NEWS लाखो रुपये किमतीची देशी व गावठी दारू जप्त.. माळेगाव पोलिसांची धडक कारवाई.
CRIME NEWS लाखो रुपये किमतीची देशी व गावठी दारू जप्त.. माळेगाव पोलिसांची धडक कारवाई.
बारामती/माळेगाव - अवैध दारू वाहतुकीच्या गाडीवर माळेगाव पोलीसांची धडक कारवाई करून ४ लाख ४६ हजार ५०० रू किंमतीची देशी तसेच गावठी हातभट्टीची दारू जप्त तसेच दोन आरोपी ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते. तसेच पुणे जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी आणली जात असल्याने अशा दारू वाहतूकदारांची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे २१:३० वाजता, माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास साळवे तसेच पोलीस अंमलदार हे सरकारी वाहनाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना प्रभारी अधिकारी श्री. कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेखर श्रीरंग पवार, रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर हा मोटारसायकल क्र. MH-16-AR-9083 वरून गावठी हातभट्टीची तयार दारू घेऊन येणार असून ती कैलास शंकर गव्हाणे, रा. माळेगाव बु।।, ता. बारामती, जि. पुणे यास विक्री करण्यासाठी देणार आहे. सदर माहितीबाबत प्रभारी अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन कारवाईचे आदेश प्राप्त केले.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ कारवाईची नियोजनबद्ध आखणी करून कऱ्हावागज चौक येथे सापळा रचला. सापळ्यादरम्यान गोपनीय माहितीतील मोटारसायकल कऱ्हावागज चौक येथे आल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने माळेगावकडून मारुती सुझुकी अल्टो कार क्र. MH-12-KT-0341 ही वाहन आली. सदर कारमधून एक इसम खाली उतरला. त्याचवेळी मोटारसायकलवरील इसमाने एक काळ्या रंगाचा ड्रम अल्टो कारमध्ये ठेवला. संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितले शेखर श्रीरंग पवार, वय २४ वर्षे, रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोदा, जि. अहिल्यानगर.
कैलास शंकर गव्हाणे, वय ३६ वर्षे, रा. माळेगाव बु।।, ता. बारामती, जि. पुणे.त्यानंतर सदर वाहनांची झडती घेतली असता देशी दारू टॅगो पंच कंपनीचे एकूण ३३ बॉक्स, किंमत ₹१,१५,५००/-, गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले ३० लिटर क्षमतेचे दोन काळ्या रंगाचे ड्रम, किंमत ₹६,०००/-, तसेच ₹३,००,०००/-किमतीची मारुती सुझुकी अल्टो कार व ₹२५,०००/- किमतीची हिरो होडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. MH-16-AR-9083, असा एकूण १४,४६,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ब.नं. २५५६ अमोल जालिंदर वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २१५/२०२६ बी.एन.एस कलम १२३,३(५) सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास साळवे करीत आहेत. तसेच आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे जाऊन गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टी शोधून ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक के कुलदीप संकपाळ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक.देविदास साळवे, पोलीस हवालदार विजय वाघमोडे, तसेच पोलीस अंमलदार धीरज कांबळे, श्रीकांत माने, ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, सागर पवार, जयसिंग कचरे, सागर गायकवाड व होमगार्ड रमजान डांगे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment