CRIME NEWS वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ सराईत गुन्हेगार जेरबंद..एकूण ११ लाख ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
CRIME NEWS वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ सराईत गुन्हेगार जेरबंद.
एकूण ११ लाख ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोमेश्वरनगर - पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने जबरी चोरी व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा करत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानडवाडी परिसरातील एका महिलेकडील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपींकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जबरी चोरी व दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
या कारवाईत राज मिशुन शिंदे, सनी रमण भोसले, पवन संडल काळे आणि बापूराव भाऊदास चोपडे यांना अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान वडगाव निंबाळकर, जेजुरी, वालचंदनगर, यवत, बारामती शहर, फलटण शहर व लोणंद पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
सदर तपासात २ मोटारसायकल व जबरी चोरीच्या गुन्हयातील सोन्याचे दागीने असा एकुन ११,८९,००० रू.कि. मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी राज मिथुन शिंदे, राह- राजाळे ता. फलटण जि.सातारा),सनि रमण भोसले राह- राजकुम बंगला, सांगवी ता. फलटण , बापुराव भानुदास चोपडे वय वर्षे, राह- राजाळे ता. फलटण, प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक वय ४३ वर्षे, राह- मारवाडपेठ फलटण, यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन पवन सॅन्डल काळे राह- मांगोबामाळ, विडणी ता. फलटण हा फरार आहे.
सदरची कामगिरी ही म. संदीप सिंह गिल्ल सो. (भा.पो. से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, श्री. चैतन्य कदम सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, व सहा. पोलीस निरीक्षक. जीवन मोहीते, प्रभारी अधिकारी, वडगांव निंबाळकर ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालार पोपट नाळे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेद्र यादव,धनंजय भोसले, हृदयनाथ देवकर, सुरज धोत्रे, भाउसाहेब मारकड, वडगांव निवाळकर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जीवन मोहीते हे करीत आहेत.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्वागत केले असून, गुन्हेगारीविरोधातील अशा कठोर कारवायांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
Comments
Post a Comment