हनुमंत चांदगुडे यांच्या ‘आडतास’ला विद्यापीठाची मोहोर; एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश

हनुमंत चांदगुडे यांच्या ‘आडतास’ला विद्यापीठाची मोहोर; एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समावेश
सोमेश्वरनगर - सुपे (ता बारामती)येथील सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे यांच्या ‘आडतास’ या काव्यसंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सुपेसह बारामतीच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमातील ‘साहित्यनिर्मिती प्रक्रिया, साहित्यनिर्मितीचे सिद्धांत-व्यवहार आणि स्वरूप’ या अभ्यासघटकासाठी ‘आडतास’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या काव्यसंग्रहातील ‘लेक’ या कवितेचा यापूर्वीच एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

वारकरी यांना औषधाचे किट मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शुभहस्ते दिडी प्रमुखांना वाटप केले बाबत.

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे