बारामती ! “माझा गट, माझं कुटुंब” या भावनेतून मातीच्या लेकी शेतकरी गटाचा स्नेहमेळावा.
बारामती : “माझा गट, माझं कुटुंब” या भावनेतून मातीच्या लेकी शेतकरी गटाचा स्नेहमेळावा व फार्म फिस्टा कार्यक्रम ऋणिता चव्हाण यांच्या उडीद पिकाच्या प्लॉटवर उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी सेंद्रिय उडीद पिकाची पाहणी, कामगंध व चिकट सापळे, पक्षी थांबे आदी उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, सहाय्यक कृषी अधिकारी विजय गोफणे, विनोद गोफणे, धुमाळ, पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गटातील ११ महिला सदस्यांनी सहभाग घेतला.
विविध खेळ, पतंग उडवणे, गप्पा, फोटोसेशन व सामुदायिक भोजनातून कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
Comments
Post a Comment