Posts

Showing posts from April, 2021

"सोमेश्वर" ला रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका !

Image
"सोमेश्वर" ला रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका !  सोमेश्वरनगर प्रतिनिधी  बाहेर विनाकारण फिराल,तर थेट हॉस्पिटलमध्ये जाल..  विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटीजेन टेस्ट.. 38 जणांच्या तपासणीत एकही   पॉजिटिव्ह नसल्याने थोडा दिलासा.. राज्य सरकारने कडक टाळेबंदी जाहीर केली असून,याची अतिशय कडक अंमलबजावणी बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे अंतर्गत करंजेपुल दुरचित्र येथे  बुधवार दि 28 रोजी करंजेपूल दुरक्षेत्र  समोरच पोलिसांकडूनही कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.व याच पार्श्वभूमीवर आज सोमेश्वरनगर मध्ये रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची  पोलिसांनी अचानकपणे अँटीजेन तपासणी करण्यात आली,व यामध्ये 38 जणांची टेस्ट मध्ये एकही  कोरोना बाधित  मिळून आलेले नसल्याने दिलासा मिळाला असला तरी , आता सोमेश्वरनगर परिसरात मोकार फिरणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या वतीने देण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड तसेच  वडगांव पोलिस स्टेशनचे पोलीस...

बारामती तालुक्यातील शेंडरवाडी शाळेस अडीच लाखाचे क्रिडा साहित्य..

Image
बारामती तालुक्यातील शेंडरवाडी शाळेस अडीच लाखाचे क्रिडा साहित्य.. सोमेश्वरनगर प्रतिनिधी  बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला सुमारे अडीच लाख रुपयांचे क्रीडा साहित्य तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते नुकतेच सुपूर्त करण्यात आले जिल्हा क्रीडा कार्यालयात व जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायतींना क्रीडा साहित्यांचा पुरवठा केला जातो या योजनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या प्रयत्नाने शेंडकरवाडी जिल्हा परिषद मध्ये बॅडमिंटन , हॉलीबॉल ,   बुद्धिबळ क्रिकेट चे साहित्य, मल्लखांब, फुटबॉल,  कॅरम ,योगा अधिक खेळांचे साहित्य प्राप्त झाले आहे शिक्षका यांचा वाडा यांनी साहित्याचा स्वीकार केला याप्रसंगी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, मोहन शेंडकर, शिवाजी शेंडकर, नितीन शेंडकर, अभिषेक शेंडकर,किरण शेंडकर उपस्थित होते.

आनंदाची बातमी- १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची मोफत लस

Image
आनंदाची बातमी- १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोनाची मोफत लस   मुंबई - देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना आणि कोरोनाच्या भितीदायक वातावरणात सर्वच भारतीयांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील १८ वर्षांवरील सर्वां साठीच कोरोना लसीकरणाची घोषणा केली आहे. केद्राच्या या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी राज्यातील सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, उत्तर प्रदेशने राज्याने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा सर्वात प्रथम निर्णय घेण्याचा बहुमान पटकावला आहे . त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड या राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र सरकारकडूनही राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. देशात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे यातच लसीकरण प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशातील तब्बल तब्बल १० कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. स्पुतनिक - लशीला परवानगी दिल्यानंतर, देशात लोकांना घरो-घरी जाऊन लस देण्याची योजना सुरू करण्यात आली...

सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८७ वर्षी अल्पशा आजराने निधन .

Image
सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे वयाच्या ८७ वर्षी अल्पशा  आजराने निधन . सोमेश्वरनगर प्रतिनिधी  मुरूम ( ता बारामती ) येथील सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या.          त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे मा.अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

ग्रामपंचायत करंजेपुल येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न.

Image
ग्रामपंचायत करंजेपुल येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न. सोमेश्वरनगर प्रतिनिधी  बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायत चे गायकवाड वस्ती येथे प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय चे भूमिपूजन नुकतेच पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते पार पडले. ग्रामपंचायत करंजेपुल येथील कार्यालय खूपच अपुरे पडत असल्याने व  कार्यालयीन कामकाज करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत होते त्यामुळे नवीन ग्रामपंचायत कार्यालय होण्याची नितांत गरज होती , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक विकास निधी (२५/१५)योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले आहे. सरपंच वैभव गायकवाड  केलेल्या प्रयत्नाला यश आले असून  ही प्रशस्त ग्रामपंचायत इमारत झाल्या वर शेजारील वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याने समाधानही व्यक्त केले. या शुभारंभास बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर तसेच सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी  बारामती पंचायत समिती सभापती नीता फरा...

बारामतीतील वाघळवाडी आरोग्य उपकेंद्र मध्ये एक हजार कोव्हीशील्ड लसीकरणचा टप्पा पूर्ण

Image
सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामतीतील वाघळवाडी आरोग्य उपकेंद्र मध्ये 1000 कोव्हीशील्ड लसीचा सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतला लाभ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाघळवाडी यांच्या माध्यमातून  उपकेंद्राचे आरोग्य समुदाय अधिकारी योगिता माळी, आरोग्य सेवक परवेझ मुलानी, आरोग्य सेविका कुसुम शिंदे, गौरी जाधव तसेच आशा सेविका लता सावंत, शैला जाधव, रोहिणी ताटे,मालन साठे यांनी लसीकरण मोहिमेत आजच्या दिवशी  ४५ वर्ष्या पुढील 1000 नागरिकांना लसीकरण केले असल्याची माहिती आरोग्यसेवक परवेश मुलाणी यांनी दिली तर या कामी वाघळवाडी सरपंच ,उपसरपंच,सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ मान्यवर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही  बोलताना धन्यवाद व आभार व्यक्त केले.

विनाकारण फिरणाऱ्या व त्यांच्या वाहनांवरही गुन्हे दाखल होणार : PSI योगेश शेलार

Image
विनाकारण फिरणाऱ्या व त्यांच्या वाहनांवरही गुन्हे दाखल होणार : PSI योगेश शेलार सोमेश्वरनगर प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने माननीय जिल्हाधिकारी  यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी वर निर्बंध घातले आहेत , त्यासाठी बुधवारपासून वेगळी नियमावली तयार केली आहे. जनतेला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आपली महत्त्वाची कामे उरकून घ्यावी लागणार आहे, त्यानंतर पूर्ण संचारबंदी असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचा वावर कमी व्हावा, त्यासाठी कलम १४४ लागू केले आहे. त्याची कडक अंमलबजावणी बारामतीतील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्या चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  करंजेपुल दुरक्षेत्र चे  पी एस आय  योगेश शेलार आपल्या कर्मचाऱ्यांच्या समवेत करंजेपुल येथील मुख्य चौकात  मधील प्रत्येक चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे  त्यांच्यासोबत होमगार्ड हि आपली सेवा बजावताना दिसत आहेत.   लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहन, विना मास्क फिरणारे वाहनधारकांची ...

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २०२ ; शहर-९५ ग्रामीण- १०७

Image
सोमेश्वरनगर प्रतिनिधी कालचे शासकीय (20/04/21) एकूण rt-pcr नमुने  608.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-128. प्रतीक्षेत -238.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --- त्यापैकी पॉझिटिव्ह ---.                   कालचे एकूण एंटीजन 247. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-74.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   128+74=202.   शहर-95 ग्रामीण- 107.             एकूण रूग्णसंख्या-14484       एकूण बरे झालेले रुग्ण- 10920 मृत्यू-- 238.  बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  73863

बारामती शहर पोलीस स्टेशन हदीत हॉटेलमध्ये खंडणी मागणारे टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई: टोळी सदस्य यांच्या मुसक्या आवळल्या

Image
बारामती शहर पोलीस स्टेशन हदीत हॉटेलमध्ये खंडणी मागणारे टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई : टोळी सदस्य यांच्या मुसक्या आवळल्या बारामती प्रतिनिधी बारामती शहर पोलीस स्टेशन हृददीत दि ०७/०२/२०२१ रोजी रात्री ०८:३० वा.ते ०९:४५ वा. व दरम्यान यातील फिर्यादी हे त्यांचे स्नेहा गार्डन फलटण रोड बारामती ता. बारामती जि. पूणे या हाॉटेलवर असताना आरोपी हे हॉटेलमध्ये येवून आरोपी क्र. १ नितीन बाळासो तांबे रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे हा फिर्यादीस 'मी एन टी भाई आहे. तु मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संवध आहेत. तुला हॉटेल निट चालवायचे असेल तर दर महीन्याला माझा माणुस येईल. त्याचेकडे २५ हजार रूपये दर महीन्याला दयायचे नाहीतर मी स्वतः एन. टी. भाई येईल लक्षात ठेव' असे म्हणून दमदाटी करून आरोपी क्र.२ अमिन दिलावर इनामदार बारामती जि. पुणे व अनोळखी तीन साथीदार हे फिर्यादीस म्हणाले की, एन.टी.भाईचे संबध लांब पर्यंत आहेत तु जर आमचेवर गुन्हा दाखल केला तर आम्ही जेलमध्ये बसु व जेलमधुन तुझा गेम करू' असे म्हणुन आरोपी क्र.१ यान हॉटेलच्या काऊंटरमधील कप्यातील मँगडॉल नंबर वन व्हिस...

हा...बारामती पॅटर्न राज्यभर राबविला तर कोरोना रुग्णांना निश्चित दिलासा मिळेल.

Image
बारामती प्रतिनिधी बारामतीत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एकीकडे प्रशासन स्तरावर उपाययोजना सुरु असताना  लोकसहभागातून मोठे काम उभे राहिले आहे. हा बारामती पॅटर्न राज्यभर राबविला तर कोरोना रुग्णांना निश्चित दिलासा मिळू शकतो. संकटात बारामतीकर एक होतात आणि त्या संकटाला एकदिलाने सामोरे जातात हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. बारामतीत गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यानंतर लक्षणे नसलेल्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटरची गरज भासणार होती. शासकीय स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शासनस्तरावर कोविड केअर सेंटर सुरु झाले. चारच दिवसांत त्याची क्षमता सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या. यात नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून किरण गुजर व त्यांचे सहकारी तसेच काही सहकारी नगरसेवक हे पुढे आले. नटराजच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात पहिले कोविड केअर सेंटर सुरु झाले. खरतर हे सेंटर सुरु करताना आणखी काही सेंट...

धक्कादायक ; बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९५ : शहर-१८९ ग्रामीण-२०६.

Image
सोमेश्वरनगर प्रतिनिधी कालचे शासकीय (19/04/21) एकूण rt-pcr नमुने  687.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-241. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -140 त्यापैकी पॉझिटिव्ह -24.                   कालचे एकूण एंटीजन 278. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-130.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   241+24+130=395.   शहर-189 ग्रामीण- 206.             एकूण रूग्णसंख्या-14282       एकूण बरे झालेले रुग्ण- 10801 मृत्यू-- 228.

खेळाडूंना घडवणारा शिक्षक हरपला ,प्राध्यापक पी. एम.गायकवाड यांचे निधन

Image
सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामती तालुक्यातील मु.सा.काकडे महाविद्यालयाचे (सोमेश्वरनगर) सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले.  काही दिवसापासून ते करोना आजाराशी झगडत होते.          त्यांच्या पश्चात पत्नी एक  मुलगा व विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते  मु.सा.काकडे महाविद्यालयात-सोमेश्वरनगर  क्रीडा शिक्षण म्हणून काम पाहत होते. त्यांनी बारामती तालुक्यासह इतर तालुक्यातील खळाडू वृत्तीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांना उंच शिखरापर्यंत नेण्याचे काम केले.

बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण- ७१६१९ एकूण बरे झालेले रुग्ण १०५८८ आहेत.. तर बारामती तालुक्यातीलरुग्ण संख्या २०६, शहर-१०७ ग्रामीण- ९९.

Image
सोमेश्वरनगर प्रतिनिधी प्रतीक्षेत असलेले शासकीय (17/04/21) एकूण rt-pcr नमुने  305.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-80. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -190 त्यापैकी पॉझिटिव्ह -49.                   कालचे एकूण एंटीजन 191. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-77.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   80+49+77=206.   शहर-107 ग्रामीण- 99.             एकूण रूग्णसंख्या-13887       एकूण बरे झालेले रुग्ण- 105 मृत्यू-- 214.  बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  71619  एकूण बरे झालेले रुग्ण 10588 आहेत

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगरमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर : ३०३ रक्त बाटल्यांचे झाले संकलन.

Image
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगरमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर : ३०३ रक्त बाटल्यांचे झाले संकलन. सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विविध संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन झाले आहे. शिबिराचे उद्घाटन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते पार पडले. रक्तदानाला रविवार दि १८ रोजी   सकाळी  नऊ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत तब्बल  ३०३  बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिरात तरुण व महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मात्र कोविड १९ ची लस घेतल्यानंतर ५६ दिवस, तसेच कोविड होऊन गेल्यानंतर ३० दिवस रक्तदान करता येत नसल्याने, याचा मोठा परिणाम या रक्तदान शिबिरावर झाल्याचा पाहायला मिळाला.             झालेल्या रक्तदान शिबिरात तरुण व महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मात्र कोविड १९ ची लस घेतल्यानंतर  ५६ दिवस, तसेच कोविड होऊन गेल्यानंतर ३० द...

देऊळवाडी-करंजे वनक्षेत्राला आग , सहा हेक्टर क्षेत्र गेले होरपळून -योगेश कोकाटे.

Image
देऊळवाडी-करंजे वनक्षेत्राला आग , सहा हेक्टर क्षेत्र गेले होरपळून -योगेश कोकाटे. सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामतीतील देऊळवाडी-करंजे असलेल्या वनकक्ष क्रमांक २९५ येथील १० हेक्टरात क्षेत्रात शनिवारी(दि. १७) रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागली. अज्ञात व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे रानगवताने साडे दहाच्या सुमारास आग  लागल्याची निदर्शनात आहे  ही आग दिसताच नजीकच्या शेतकरी माधनाना रासकर यांनी त्वरित  वनअधिकारी  व कर्मचारी संपर्क केला  असता त्वरित आग विझविण्यास सुरुवात झाल्याने रोपवनाचे मोठे नुकसान टळले आहे. मात्र, काही छोटे मोठे वन्यजीव तर लावलेली काही  रोपे  मात्र या आगीत करपली अवस्थेत असल्याची पाहणी वेळी निदर्शनात आली, वनक्षेत्रात नेमक्या कोणाच्या चुकीमुळे आग लागली, याचा शोध सुरू असून, संशयित आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती  वनविभाग अधिकारी योगेश कोकाटे यांनी दिली  आग लागल्याचे समजताच  वनाधिकारी योगेश कोकाटे, कर्मचारी नंदकुमार गायकवाड,अविनाश ,पपु जाधव, विठ्ठल जाधव, सचिन चौधरी , तसेच युवा कार्यकर्ते बाळू चौधरी...

मोकार फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करून आयसोलेशन मध्ये रवानगी करणार : सुनील महाडिक

Image
निरा प्रतिनिधी            पुरंदर तालुक्यात तसेच नीरा व परिसरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल त्याच बरोबर जे रस्त्यावर विनाकारण फिरतील त्या लोकांची त्याच वेळी कोरोना चाचणी केली जाईल आणि कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना  कोरोना सेंटरमध्ये पाठवले जाईल, अशी माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे. विनाकारण फिरणारा मुळेच कोरोनाचा प्रसार जास्त होतोय. आणि अशा मोकार फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाईचा इशारा त्यांने दिला आहे.  आज दिनांक १७ एप्रिल रोजी नीरा येथील कोरोना परिस्थिती संदर्भात तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर महाडिक माध्यमांशी बोलताना होते. यावेळी तहसिलदार रूपाली सरनोबत, जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी विवेक अबनावे, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, माजी उपसरपंच विजय शिंदे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, सारिका काकडे, वैशाली काळे...

बारामती प्रभात या वृत्तपत्राचा प्रकाशन कार्यक्रम संपन्न

Image
  सोमेश्वरनगर प्रतिनिधी सोमेश्वर मुख्य कार्यालय (ता बारामती )येथे ... बारामती प्रभात या वृत्तपत्राचे प्रकाशन श्री सोमेश्वर सहकारी  साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले , प्रकाशन प्रसंगी बोलताना बारामती प्रभात च्या माध्यमातून सामाजिक , शैक्षणिक , राजकीय तसेच सामान्य जनतेचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातुन न्याय द्यावा  हीच शुभेच्छा अध्यक्ष  जगताप यांनी दिली.       याप्रसंगी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , संचालक विशाल गायकवाड, किशोर भोसले,शेतकीअधिकारी बापूसाहेब गायकवाड,बारामती प्रभात संपादक विनोद गोलांडे उपस्थित होते.

'सोमेश्वर' ला येताय सावधान : संचारबंदीला चांगला प्रतिसाद तर पोलिसांचा चोख बंदोबस्त : पी एस आय योगेश शेलार

Image
सोमेश्वरनगर प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिल ते १ मे दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आज बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना कडकडीत बंद ठेवत संचारबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. करंजेपुल मुख्य रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन व नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत नव्हते , मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता मात्र सोमेश्वर चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ऊसतोड कामगार वगळता शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सोमेश्वरनगर मध्ये ठिकठिकाणी वडगांव निंंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरनगरला  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच करंजेपुल मुख्य रस्त्यांवर  बॅरिकेडस लावण्यात आले आहे .विनाकारण फिरणाऱ्यां नागरिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आले असून इथून पुढे सोमेश्वरनगर मध्ये  मोकाट फिरणाऱ्यांनवर नजर असल्याचे करंजे पूल दुरक्षेत्र च्या पोलीस कर्मचाऱयांनी सां...

करंजे व परिसरातील नागरिकांना कोविड लसीकर करून घ्या ,ते सुरक्षितेचे आहे : सरपंच जया गायकवाड

Image
सोमेश्वरनगर प्रतिनिधी  बारामतीमधील करंजे येथील नागरिकांना  कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असून यामध्ये जेष्ठ पुरुष व महिलांनी सर्वाधिक उपस्थित दर्शवत गावातील आज बुधवार दि १४ रोजी १०० नागरिकांनी लस घेतली असून येथून पुढे नियमित लसीकरण होणार असल्याचे डॉ दिपक गोसावी यांनी सांगितले.         करंजे (ता बारामती)  कोविड लसीकरण मोहिमेचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हस्ते बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे यांच्या हस्ते पार पडले . अध्यक्षस्थानी सरपंच जया गायकवाड  होत्या. उद्घघाटन कार्यक्रम प्रसंगी मा.तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, मा उपसरपंच माऊली केंजळे,प्रभाकर बोकील,भानुदास रासकर ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड ,पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे तसेच  ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी कामगार व ग्रामस्थ  उपस्थित होते.          बांधकाम व  आरोग्य सभापती प्रमोद काकडे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी म्हणाले की, लसीकरण करण्यासा...

पुरंदरच्या युवतींनी उभारली स्त्री शक्तीची गुडी ; वाडासंस्कृती जतन करण्याचा दिला संदेश

Image
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर  नदाफ                                             स्त्रीनं कित्येक शतकांपासून संस्कृतीची गुडी उभारून धरलेली आहे..महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील लोकप्रिय सन असलेल्या गुडी पाडव्याचा प्रारंभ पुरंदर च्या युवतींनी अभिनव पद्धतीने केला असून समाजतील स्त्रीचा सन्मान उंचाविण्या करिता   हरवत चाललेल्या वाडा आणि एकत्र कुटुंब पद्धतीला  पुनरचालना मिळावी असा संदेश देत पुरंदर च्या जयाद्री कन्या परिवाराने एकत्र येऊन जेजुरी नजीकच्या हरणी दत्तनगर येथील  यादव यांच्या शंभर वर्ष झालेल्या जुन्या वाड्यावर तिरंग्यातून मांगल्याची गुडी उभारली आहे. .........…...............सद्याच्या युगात पुरुषांच्या  खांद्याला खांदा देत आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकावत नारी शक्ती आधुनिकता आणि डिजिटल क्षेत्रात अग्रेसर झाली असली तरीही  आपली परंपरा व  लोकसंस्कृतीशी आपले नाते जोडत आली आहे. स्त्रीनं ज्या संस्कृतीरूपी गंगेला जन्माला घातलं त्या स...

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Image
 विशेष प्रतिनिधी राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आज मी आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मला सांगायला पाहिजे की मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं.

भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुकाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार सुभाष कदम यांची निवड

Image
पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ  भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुकाध्यक्ष पदी आलेगावचे जेष्ठ पत्रकार सुभाष विनायक कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष एम एस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश संघटक अनिल सोनवणे तसेच पुणे विभागीय अध्यक्ष कैलास पठारे यांच्या अनुमतीने  पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेशजी लेंडे यांच्या हस्ते  सुभाष कदम यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी राजेगावच्या महिला उपसरपंच सीमा शितोळे , प्रहार जनशक्ती संघटनेचे दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे भारतीय पत्रकार संघ  पुरंदरचे  तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ,प्रसिद्धी प्रमुख जयंत पाटील भाजप युवा आघाडी दौंड तालुक्याचे सचिन खैरे पत्रकार विठ्ठल मोघे अतुल काळदाते यांसह बहुसंख्य पत्रकार  उपस्थित होते. ..या दरम्यान भारतीय पत्रकार संघाचे नवनिर्वाचित दौंड तालुकाध्यक्ष सुभाषजी कदम यांसह  पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे  स्वागत राजेगाव ग्रामपंचायतीच्या  वतीने फेटा बांधून  करण्यात आले.

वडगाव निंबाळकर मध्ये तरुणावर सतुरानेे प्राणघातक हल्ला..

Image
बारामती प्रतिनिधी                                                           वडगाव निंबाळकर:-बारामती तालुक्यातील वडगाव  निंबाऴकर पोलीस स्टेशन गुर नं  139/2021 भादवि कलम   307,323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी-   विकास शिवाजी जाधव  वय 40 वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर ,रा.आनंदनगर ,सस्तेवाडी  ता.बारामती जि. पुणे. याने दिलेल्या फिर्यादी नुसार आऱोपी-1) अशोक आण्णा कारंडे  2)गुणवंत अशोक कारंडे 3)आप्पा उर्फ अनिकेत अशोक कारंडे  सर्व रा आनंदनगर .यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दि.1/4/2021 रोजी सकाऴी 9/00 वा चे सुमारास मौजे सस्तेवाडी  ता.बारामती जि. पुणे गावचे हदीत आनंदनगर येथे आरोपी यांनी  जुने भांडणाचे कारणावरुन व त्याचा राग मनात धरुन  फिर्यादीची मोटार सायकल आडवुन   आरोपी अशोक आण्णा कारंडे व गुणवंत अशोक कारंडे यांनी फिर्यादीचे दोन्ही हात धरुन त्या...