हा...बारामती पॅटर्न राज्यभर राबविला तर कोरोना रुग्णांना निश्चित दिलासा मिळेल.



बारामती प्रतिनिधी

बारामतीत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एकीकडे प्रशासन स्तरावर उपाययोजना सुरु असताना 
लोकसहभागातून मोठे काम उभे राहिले आहे. हा बारामती पॅटर्न राज्यभर राबविला तर कोरोना रुग्णांना निश्चित दिलासा मिळू शकतो. संकटात बारामतीकर एक होतात आणि त्या संकटाला एकदिलाने सामोरे जातात हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. बारामतीत गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यानंतर लक्षणे नसलेल्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटरची गरज भासणार होती. शासकीय स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शासनस्तरावर कोविड केअर सेंटर सुरु झाले. चारच दिवसांत त्याची क्षमता सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या.


यात नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून किरण गुजर व त्यांचे सहकारी तसेच काही सहकारी नगरसेवक हे पुढे आले. नटराजच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात पहिले कोविड केअर सेंटर सुरु झाले. खरतर हे सेंटर सुरु करताना आणखी काही सेंटर सुरु करावी लागतील अशी कोणाला कल्पनाही नव्हती. आज बारामती शहरात तारांगण, अहिल्यादेवी होळकर वसतिगृह, टीसी महाविद्यालय तसेच विद्या प्रतिष्ठानच्या वसतिगृहात तसेच माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वसतिगृहासह लोकसहभागातून तब्बल 1525 खाटांची व्यवस्था उभारुन बारामतीकरांना दिलासा देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.