बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगरमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर : ३०३ रक्त बाटल्यांचे झाले संकलन.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगरमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर : ३०३ रक्त बाटल्यांचे झाले संकलन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विविध संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन झाले आहे. शिबिराचे उद्घाटन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते पार पडले. रक्तदानाला रविवार दि १८ रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
रक्तदान शिबिरात तरुण व महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मात्र कोविड १९ ची लस घेतल्यानंतर ५६ दिवस, तसेच कोविड होऊन गेल्यानंतर ३० दिवस रक्तदान करता येत नसल्याने, याचा मोठा परिणाम या रक्तदान शिबिरावर झाल्याचा पाहायला मिळाला.
झालेल्या रक्तदान शिबिरात तरुण व महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मात्र कोविड १९ ची लस घेतल्यानंतर ५६ दिवस, तसेच कोविड होऊन गेल्यानंतर ३० दिवस रक्तदान करता येत नसल्याने, याचा मोठा परिणाम या रक्तदान शिबिरावर झाल्याचा पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे मा अध्यक्ष शहाजी काकडे, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते ,युवा नेते गौतम काकडे यांच्या पुढाकारातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तर याप्रसंगी सोमेश्वरचे संचालक, महेश काकडे, राष्ट्रवादी युवक चे मा. अध्यक्ष विक्रम भोसले, अभिजीत काकडे, सराफ असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष किरण आळंदीकर,सामाजिक कार्यकर्ते डॉ. सौरभ काकडे, उद्योजक आर. एन. शिंदे, सुनिल भोसले, दिपक साखरे, डॉ.मनोहर कदम, डॉ. सुधीर कदम, डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. राहुल शिंगटे, डॉ. अमोल जगताप, अॅड. नवनाथ भोसले, मराठा महा संघाचे तालुकाध्यक्ष अमोल भोसले, सामाजिक कार्यकर्ते योगेश सोळस्कर, ॲड. गणेश आळंदीकर, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंदे, तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे,करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड, पत्रकार संतोष शेंडकर,महेश जगताप,युवराज खोमणे, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ, यांच्यासह बाळासाहेब शेंडकर,युवा नेते तुषार सकुंडे, वाघळवाडी ग्रा. सदस्य हेमंत गायकवाड,आकाश सावळकर तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील युवकांनी या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
.................................
बारामती प्रभात
संपादक-विनोद गोलांडे
मो नं.9762208437
Comments
Post a Comment