ग्रामपंचायत करंजेपुल येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न.

ग्रामपंचायत करंजेपुल येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायत चे गायकवाड वस्ती येथे प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय चे भूमिपूजन नुकतेच पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते पार पडले. ग्रामपंचायत करंजेपुल येथील कार्यालय खूपच अपुरे पडत असल्याने व  कार्यालयीन कामकाज करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत होते त्यामुळे नवीन ग्रामपंचायत कार्यालय होण्याची नितांत गरज होती , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक विकास निधी (२५/१५)योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले आहे.
सरपंच वैभव गायकवाड  केलेल्या प्रयत्नाला यश आले असून  ही प्रशस्त ग्रामपंचायत इमारत झाल्या वर शेजारील वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याने समाधानही व्यक्त केले.

या शुभारंभास बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर तसेच सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी शुभेच्छा दिल्या

या कार्यक्रम प्रसंगी  बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे , बारामती पंचायत समिती सदस्या मेनका मगर , बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे  संचालक विशाल गायकवाड,आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, करंजेपुल उपसरपंच निलेश गायकवाड सदस्य ,लतीफ मुलाणी ,सविता लकडे, गणेश गायकवाड कैलास मगर  ,बाळू गायकवाड ,स्वप्नील गायकवाड,ग्रामसेवक आबा यादव कर्मचारी श्रीकांत शेंडकर तसेच ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक व आभार सरपंच वैभव गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे मानले

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.