वडगाव निंबाळकर मध्ये तरुणावर सतुरानेे प्राणघातक हल्ला..
बारामती प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर:-बारामती तालुक्यातील वडगाव निंबाऴकर पोलीस स्टेशन गुर नं 139/2021 भादवि कलम 307,323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल झाला असून फिर्यादी- विकास शिवाजी जाधव वय 40 वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर ,रा.आनंदनगर ,सस्तेवाडी ता.बारामती जि. पुणे. याने दिलेल्या फिर्यादी नुसार आऱोपी-1) अशोक आण्णा कारंडे 2)गुणवंत अशोक कारंडे 3)आप्पा उर्फ अनिकेत अशोक कारंडे सर्व रा आनंदनगर .यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दि.1/4/2021 रोजी सकाऴी 9/00 वा चे सुमारास मौजे सस्तेवाडी ता.बारामती जि. पुणे गावचे हदीत आनंदनगर येथे आरोपी यांनी जुने भांडणाचे कारणावरुन व त्याचा राग मनात धरुन फिर्यादीची मोटार सायकल आडवुन आरोपी अशोक आण्णा कारंडे व गुणवंत अशोक कारंडे यांनी फिर्यादीचे दोन्ही हात धरुन त्यास जिवे मारण्याचे उद्देशाने आरोपी नं 3 याने त्याचे हातातील सतुराने फिर्यादीचे मानेवर वार करत असता तो वार वाचविण्यासाठी फिर्यादीने हात मानेवर घेतला असता तो वार त्याचे हातावर बसुन गंभीर जखम झाली आणि दुसरा वार पुन्हा मानेवर मारत असताना फिर्यादीने तो वार वाचविण्यसाठी डावा हात मानेवर घेतला असता तो वार फिर्यादीचे हाताचे अंगठ्यावर बसुन गंभीर जखम झाली व आरोपी यांनी त्यास लाथाबुक्क्यानी मारहाण करुन शिवीगाऴ करत निघुन गेले आहेत सध्या, त्याचेवर औषधोपचार चालु आहेत वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई शेलार हे करीत आहेत सदर आरोपी फरार असून त्वरित अटक करण्याचा मागणीसाठी समाज बांधवांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटणार असल्याचे समजते.
Comments
Post a Comment