भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुकाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार सुभाष कदम यांची निवड
पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ
भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुकाध्यक्ष पदी आलेगावचे जेष्ठ पत्रकार सुभाष विनायक कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष एम एस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश संघटक अनिल सोनवणे तसेच पुणे विभागीय अध्यक्ष कैलास पठारे यांच्या अनुमतीने पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेशजी लेंडे यांच्या हस्ते सुभाष कदम यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी राजेगावच्या महिला उपसरपंच सीमा शितोळे , प्रहार जनशक्ती संघटनेचे दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे भारतीय पत्रकार संघ पुरंदरचे तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ,प्रसिद्धी प्रमुख जयंत पाटील भाजप युवा आघाडी दौंड तालुक्याचे सचिन खैरे पत्रकार विठ्ठल मोघे अतुल काळदाते यांसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. ..या दरम्यान भारतीय पत्रकार संघाचे नवनिर्वाचित दौंड तालुकाध्यक्ष सुभाषजी कदम यांसह पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत राजेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने फेटा बांधून करण्यात आले.
Comments
Post a Comment