करंजे व परिसरातील नागरिकांना कोविड लसीकर करून घ्या ,ते सुरक्षितेचे आहे : सरपंच जया गायकवाड
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीमधील करंजे येथील नागरिकांना कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असून यामध्ये जेष्ठ पुरुष व महिलांनी सर्वाधिक उपस्थित दर्शवत गावातील आज बुधवार दि १४ रोजी १०० नागरिकांनी लस घेतली असून येथून पुढे नियमित लसीकरण होणार असल्याचे डॉ दिपक गोसावी यांनी सांगितले.
करंजे (ता बारामती) कोविड लसीकरण मोहिमेचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हस्ते बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे यांच्या हस्ते पार पडले . अध्यक्षस्थानी सरपंच जया गायकवाड होत्या. उद्घघाटन कार्यक्रम प्रसंगी मा.तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, मा उपसरपंच माऊली केंजळे,प्रभाकर बोकील,भानुदास रासकर ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड ,पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.
बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी म्हणाले की, लसीकरण करण्यासाठी गावातील नागरिकांना त्रास होयला नको म्हणून सरपंच जया गायकवाड यांच्या मागणी वरुन आपण गाव पातळीवर उपकेंद्र स्तरावर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी लसीकरण उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सर्व ४५ आणि ६५ वर्ष वरील नागरिकांना आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण टप्याटप्याने करण्यात येईल. लस सगळ्यांना पुरेल अशी व्यवस्था आरोग्य विभागास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
या प्रसंगी करंजे सरपंच जया गायकवाड बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे , बारामती पंचायत समिती च्या सभापती निता फरांदे यांचे आरोग्य उपकेंद्र ग्रामपंचायत कार्यालय तसेच करंजे गावातील वयोवृद्ध, जेष्ठ नागरिक व महिला यांना कोरोना लसीकरण उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्या माध्यमातून करंजे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य समुदाय अधिकारी डॉ दिपक गोसावी , आरोग्य सेवक संभाजी कजभे, आरोग्य सेविका स्वाती वाघमारे, ज्योती खुडे, तसेच सर्व आशा वर्कर सेविका यांनी लसीकरण मोहिमेत नागरिकांना लसीकरण केले.
Comments
Post a Comment