पुरंदरच्या युवतींनी उभारली स्त्री शक्तीची गुडी ; वाडासंस्कृती जतन करण्याचा दिला संदेश
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ
स्त्रीनं कित्येक शतकांपासून संस्कृतीची गुडी उभारून धरलेली आहे..महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील लोकप्रिय सन असलेल्या गुडी पाडव्याचा प्रारंभ पुरंदर च्या युवतींनी अभिनव पद्धतीने केला असून समाजतील स्त्रीचा सन्मान उंचाविण्या करिता हरवत चाललेल्या वाडा आणि एकत्र कुटुंब पद्धतीला पुनरचालना मिळावी असा संदेश देत पुरंदर च्या जयाद्री कन्या परिवाराने एकत्र येऊन जेजुरी नजीकच्या हरणी दत्तनगर येथील यादव यांच्या शंभर वर्ष झालेल्या जुन्या वाड्यावर तिरंग्यातून मांगल्याची गुडी उभारली आहे. .........…...............सद्याच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा देत आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकावत नारी शक्ती आधुनिकता आणि डिजिटल क्षेत्रात अग्रेसर झाली असली तरीही आपली परंपरा व लोकसंस्कृतीशी आपले नाते जोडत आली आहे. स्त्रीनं ज्या संस्कृतीरूपी गंगेला जन्माला घातलं त्या संस्कृतीचा प्रचार, प्रसार अन् संवर्धन करण्याचं कार्य प्रामुख्यानं तिनचं केले आहे. या भूमीवरील मूळची मातृप्रधान संस्कृती, त्याचबरोबर पितृप्रधान संस्कृतीतही जतन व्हावी म्हणूनच नऊवारी साडी मराठमोळी वेशभूषा अशा पोषाखा बरोबर कलानृत्य संस्कृती ची वेशभूषा परिधान करीत मांगल्याचे प्रतिक असलेल्या गुडीची प्रतीकात्मक गुडी तयार करून हरणी येथील यादवांच्या वाड्यावर गुडी पूजन केले आहे या अभिनव उपक्रमात सोनल यादव रीतुषा झगडे ,ज्ञानेश्वरी गवारे ,नेहा सातभाई तनुजा साखरे .समीक्षा काकडे कु आर्यन किरण यादव वीरेश्वर कला मंचचे श्रेयस गवारे प्रज्वल भुंगे ,यांनी सहभाग घेतला होता तर या उपक्रमास माजी सरपंच कृष्णानाना यादव यांनी विशेष सहकार्य केले आहे. आजच्या गतिमान जगात समाज संस्कृती स्त्री शक्ती आणि एकत्र कटुंब पद्धतीचे जतन केले जावे या करिता प्रतीकात्मक गुडीने पाडवा साजरा करून जयाद्रीकन्या परिवाराने एक स्तुत्य कानमंत्र दिला असल्याचे मत सिने अभिनेते विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment