विनाकारण फिरणाऱ्या व त्यांच्या वाहनांवरही गुन्हे दाखल होणार : PSI योगेश शेलार
विनाकारण फिरणाऱ्या व त्यांच्या वाहनांवरही गुन्हे दाखल होणार : PSI योगेश शेलार
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने माननीय जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी वर निर्बंध घातले आहेत , त्यासाठी बुधवारपासून वेगळी नियमावली तयार केली आहे. जनतेला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आपली महत्त्वाची कामे उरकून घ्यावी लागणार आहे, त्यानंतर पूर्ण संचारबंदी असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचा वावर कमी व्हावा, त्यासाठी कलम १४४ लागू केले आहे. त्याची कडक अंमलबजावणी बारामतीतील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्या चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दुरक्षेत्र चे पी एस आय योगेश शेलार आपल्या कर्मचाऱ्यांच्या समवेत करंजेपुल येथील मुख्य चौकात मधील प्रत्येक चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे त्यांच्यासोबत होमगार्ड हि आपली सेवा बजावताना दिसत आहेत.
लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहन, विना मास्क फिरणारे वाहनधारकांची विचारपूस पोलीस कर्मचारी करीत आहेत. तसेच अनावश्यक फिरणारी वाहने जप्त करण्यात येतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विनाकारण फिरणारी दुचाकी चारचाकी वाहने जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जप्त केलेली वाहने राज्यातील लॉक डाऊन जोपर्यंत शिथील होत नाही तोपर्यंत वाहनधारकांना मिळणार नसल्याचे आवाहन पोलिसांनी केले. विनाकारण, विना मास्क फिरणाऱ्याच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे करंजेपुल पी एस आय योगेश शेलार यांनी सांगितले.
प्रशासनाणे दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे दिलेल्या वेळेतच आपली कामे करावी , विनाकारण विनामस्क न फिरता घरी राहून कुटूंबाचीव घ्यावी असे आव्हान करंजेपुल दुरक्षेत्र पी एस आय योगेश शेलार यांनी केले आहे.
सोमेश्वर परिसरातील सर्वात वेगवान वर्तमानपत्र
ReplyDelete