बारामतीतील वाघळवाडी आरोग्य उपकेंद्र मध्ये एक हजार कोव्हीशील्ड लसीकरणचा टप्पा पूर्ण
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील वाघळवाडी आरोग्य उपकेंद्र मध्ये 1000
कोव्हीशील्ड लसीचा सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतला लाभ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाघळवाडी यांच्या माध्यमातून उपकेंद्राचे आरोग्य समुदाय अधिकारी योगिता माळी, आरोग्य सेवक परवेझ मुलानी, आरोग्य सेविका कुसुम शिंदे, गौरी जाधव तसेच आशा सेविका लता सावंत, शैला जाधव, रोहिणी ताटे,मालन साठे यांनी लसीकरण मोहिमेत आजच्या दिवशी ४५ वर्ष्या पुढील 1000 नागरिकांना लसीकरण केले असल्याची माहिती आरोग्यसेवक परवेश मुलाणी यांनी दिली तर या कामी वाघळवाडी सरपंच ,उपसरपंच,सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ मान्यवर यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही बोलताना धन्यवाद व आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment