मोकार फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करून आयसोलेशन मध्ये रवानगी करणार : सुनील महाडिक
निरा प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात तसेच नीरा व परिसरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल त्याच बरोबर जे रस्त्यावर विनाकारण फिरतील त्या लोकांची त्याच वेळी कोरोना चाचणी केली जाईल आणि कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना कोरोना सेंटरमध्ये पाठवले जाईल, अशी माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे. विनाकारण फिरणारा मुळेच कोरोनाचा प्रसार जास्त होतोय. आणि अशा मोकार फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाईचा इशारा त्यांने दिला आहे.
आज दिनांक १७ एप्रिल रोजी नीरा येथील कोरोना परिस्थिती संदर्भात तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर महाडिक माध्यमांशी बोलताना होते. यावेळी तहसिलदार रूपाली सरनोबत, जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी विवेक अबनावे, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, माजी उपसरपंच विजय शिंदे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, सारिका काकडे, वैशाली काळे, जबीन डांगे, राधा माने, वर्षा जावळे, ग्रामसेवक मनोज डेरे, मंडलाधिकारी संदीप चव्हाण, नीरेचे पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, तलाठी बजरंग सोनवले, मंगेश ढमाळ यांच्यासह ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment