देऊळवाडी-करंजे वनक्षेत्राला आग , सहा हेक्टर क्षेत्र गेले होरपळून -योगेश कोकाटे.
देऊळवाडी-करंजे वनक्षेत्राला आग , सहा हेक्टर क्षेत्र गेले होरपळून -योगेश कोकाटे.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील देऊळवाडी-करंजे असलेल्या वनकक्ष क्रमांक २९५ येथील १० हेक्टरात क्षेत्रात शनिवारी(दि. १७) रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागली. अज्ञात व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे रानगवताने साडे दहाच्या सुमारास आग लागल्याची निदर्शनात आहे ही आग दिसताच नजीकच्या शेतकरी माधनाना रासकर यांनी त्वरित वनअधिकारी व कर्मचारी संपर्क केला असता त्वरित आग विझविण्यास सुरुवात झाल्याने रोपवनाचे मोठे नुकसान टळले आहे. मात्र, काही छोटे मोठे वन्यजीव तर लावलेली काही रोपे मात्र या आगीत करपली अवस्थेत असल्याची पाहणी वेळी निदर्शनात आली, वनक्षेत्रात नेमक्या कोणाच्या चुकीमुळे आग लागली, याचा शोध सुरू असून, संशयित आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनविभाग अधिकारी योगेश कोकाटे यांनी दिली
आग लागल्याचे समजताच वनाधिकारी योगेश कोकाटे, कर्मचारी नंदकुमार गायकवाड,अविनाश ,पपु जाधव, विठ्ठल जाधव, सचिन चौधरी , तसेच युवा कार्यकर्ते बाळू चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या झाडांच्या फांद्यांच्या आधारे पेटलेले गवत विझविण्याचा प्रयत्न केला.
शेजारील गाववस्तीवर जाऊन जनजागृती करण्यासह आग लागण्यास कारण ठरलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना वनविभागा मार्फत देण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment