बारामती तालुक्यातील शेंडरवाडी शाळेस अडीच लाखाचे क्रिडा साहित्य..
बारामती तालुक्यातील शेंडरवाडी शाळेस अडीच लाखाचे क्रिडा साहित्य..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला सुमारे अडीच लाख रुपयांचे क्रीडा साहित्य तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते नुकतेच सुपूर्त करण्यात आले जिल्हा क्रीडा कार्यालयात व जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायतींना क्रीडा साहित्यांचा पुरवठा केला जातो या योजनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या प्रयत्नाने शेंडकरवाडी जिल्हा परिषद मध्ये बॅडमिंटन , हॉलीबॉल , बुद्धिबळ क्रिकेट चे साहित्य, मल्लखांब, फुटबॉल, कॅरम ,योगा अधिक खेळांचे साहित्य प्राप्त झाले आहे शिक्षका यांचा वाडा यांनी साहित्याचा स्वीकार केला याप्रसंगी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, मोहन शेंडकर, शिवाजी शेंडकर, नितीन शेंडकर, अभिषेक शेंडकर,किरण शेंडकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment