'सोमेश्वर' ला येताय सावधान : संचारबंदीला चांगला प्रतिसाद तर पोलिसांचा चोख बंदोबस्त : पी एस आय योगेश शेलार


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने १५ एप्रिल ते १ मे दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आज बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना कडकडीत बंद ठेवत संचारबंदीला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

करंजेपुल मुख्य रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन व नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत नव्हते , मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता मात्र सोमेश्वर चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने ऊसतोड कामगार वगळता शासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सोमेश्वरनगर मध्ये ठिकठिकाणी वडगांव निंंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरनगरला  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच करंजेपुल मुख्य रस्त्यांवर  बॅरिकेडस लावण्यात आले आहे .विनाकारण फिरणाऱ्यां नागरिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आले असून इथून पुढे सोमेश्वरनगर मध्ये  मोकाट फिरणाऱ्यांनवर नजर असल्याचे करंजे पूल दुरक्षेत्र च्या पोलीस कर्मचाऱयांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.

Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन