"सोमेश्वर" ला रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका !
"सोमेश्वर" ला रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका !
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बाहेर विनाकारण फिराल,तर थेट हॉस्पिटलमध्ये जाल..
विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटीजेन टेस्ट.. 38 जणांच्या तपासणीत एकही पॉजिटिव्ह नसल्याने थोडा दिलासा..
राज्य सरकारने कडक टाळेबंदी जाहीर केली असून,याची अतिशय कडक अंमलबजावणी बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे अंतर्गत करंजेपुल दुरचित्र येथे बुधवार दि 28 रोजी करंजेपूल दुरक्षेत्र समोरच पोलिसांकडूनही कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.व याच पार्श्वभूमीवर आज सोमेश्वरनगर मध्ये रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी अचानकपणे अँटीजेन तपासणी करण्यात आली,व यामध्ये 38 जणांची टेस्ट मध्ये एकही कोरोना बाधित मिळून आलेले नसल्याने दिलासा मिळाला असला तरी , आता सोमेश्वरनगर परिसरात मोकार फिरणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या कारवाई दरम्यान करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड तसेच वडगांव पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी नितीन बोराडे ,महादेव साळुंखे ,गौतम लोकरे, रमेश नागटीलक ,ज्ञानेश्वर सानप हे उपस्थित असून याकामी होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानदीप राजगे आणि वाघळवाडी उपकेंद्र चे आरोग्य सेवक परवेश मुलाणी उपस्थित हो
कुठलेही काम नसताना,नागरिकांनी विनाकारण रस्त्यांवर फिरू नये,अन्यथा विनाकारण फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही,तसेच कडक टाळेबंदी लागू आहे . त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे.
वडगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे
Comments
Post a Comment