मुरूम ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित संचालक अभिजीत काकडे यांचा सत्कार.भरघोस मतांनी विजयी झाल्याने सोमेश्वर पंचक्रोशीत जल्लोष; निवासस्थानी जाऊन केला सन्मान.

मुरूम ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित संचालक अभिजीत काकडे यांचा सत्कार.

भरघोस मतांनी विजयी झाल्याने सोमेश्वर पंचक्रोशीत जल्लोष; निवासस्थानी जाऊन केला सन्मान.
सोमेश्वर कारखाना निवडणूक अधिकच्या मतधिकनी निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित राजवर्धन शिंदे आणि प्रमुखकाका काकडे यांचाही सत्कार करण्यात आला. 

सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक अभिजीत सतीशराव काकडे यांचा मुरूम येथील युवा कार्यकर्ते, ऊस उत्पादक सभासद आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभिजीत काकडे यांनी भरघोस मतांनी विजय मिळवल्याने सोमेश्वर पंचक्रोशीत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या विजयाबद्दल मुरूम येथील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
अभिजीत काकडे यांच्याबद्दल मुरूम परिसरातील ग्रामस्थांना विशेष जिव्हाळा आणि प्रेम असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कारामुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळून देणार.
--- निर्वाचित संचालक अभिजीत काकडे---

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.