नवनिर्वाचित संचालक ऋषिकेश गायकवाड निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर!ऊस सभासदाच्या परवानगीशिवाय ऊस जाळला तर ऊसतोड कामगाराच्या वाहतुकीतून पैसे कट : ऋषिकेश गायकवाड
नवनिर्वाचित संचालक ऋषिकेश गायकवाड निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर!
ऊस सभासदाच्या परवानगीशिवाय ऊस जाळला तर ऊसतोड कामगाराच्या वाहतुकीतून पैसे कट : ऋषिकेश गायकवाड
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी (विनोद गोलांडे)
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवनिर्वाचित संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सोमेश्वर परिसरातील संभाजी दाजीराम धायगुडे यांच्या शेतातील ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्याला दिलासा दिला.
रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास गट क्रमांक ६३४ मधील शेतात आग लागली. पक्षी बसल्यामुळे विद्युत वाहिनीवर स्पार्किंग होऊन आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या आगीत सुमारे साडेसहा एकर आडसाली ऊस आणि दीड एकर खोडवा जळून नुकसान झाल्याची माहिती संभाजी धायगुडे यांनी दिली.
अनुदानातील झाडे, नारळाची झाडे आणि पीव्हीसी पाइपलाइनही जळाली
आगीची तीव्रता मोठी असल्याने शेतातील ऊस जळून खाक झाला. सोमेश्वर कारखान्याकडून अनुदानातून उपलब्ध करून देण्यात आलेली बांधावरील सुमारे ७० ते ८० झाडे जळाल्याचे दिसून आले. तसेच बांधावरील नारळाची झाडे आणि शेतात ठिकठिकाणी टाकलेली पीव्हीसी पाइपलाइनही आगीत जळून नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
महावितरण कर्मचाऱ्याची आग विझवताना दुखापत
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमेश्वर महावितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. आग विझविण्याच्या प्रयत्नात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली.
निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. आगीमुळे ऊस पिकासह झाडे आणि पाइपलाइनचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment