श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारचा श्री सोमेश्वर पालखी सोहळा व यात्रा नियोजन बैठक.
श्री सोमेश्वर मंदिर येथे बुधवार दि २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार दिन ७ सप्टेंबर रोजी असून श्री सोमेश्वर पालखी सोहळा व यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. या अनुषंगाने नियोजन बैठक करण्यासाठी बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्री सोमेश्वर देवस्थान ऑफिस शेजारील जागेत मंदिराच्या प्रांगणात मीटिंग आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट यांनी दिली आहे.
आयोजित बैठक वेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीदरम्यान सोमेश्वर पंचक्रोशीतील आजी माजी पदाधिकारी व नागरी ग्रामस्थ तसेच आंबवळे,जळगाव , को-हाळे येथील मानकरी यांनी उपस्थित राहावे अशी माहिती देवस्थान ट्रस्ट यांनी दिली.
Comments
Post a Comment