श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात श्रावण मास सांगता समारोप भक्तिमय वातावरणात.
श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात श्रावण मास सांगता समारोप भक्तिमय वातावरणात.
फोटो ओळ : लालासाहेब नलवडे यांनी सोमेश्वर देवस्थान जर्णोधार देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार.
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यात्रा उत्सवाचा श्रावण मास सांगता समारोप शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
श्रावण महिन्यात श्री क्षेत्र सोमेश्वर येथे महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी विविध जिल्ह्यांतून हजारो शिवभक्त स्वयंभू सोमेश्वर शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत असतात. यंदाही संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
सांगता समारोप कार्यक्रमानिमित्त लुई बेल अपंग संस्था वाघोली पुणे यांच्या वतीने भगवदगीता तसेच भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साध संगीत स्वरगंध ग्रुपचे तेजस कदम व पुरुषोत्तम करडे यांनी भक्तिमय गीतांची प्रस्तुती केली. त्यांच्या योगदानाबद्दल कै. युवराज अण्णा मगर यांच्या स्मरणार्थ शरद मगर यांनी सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
लालासाहेब नलवडे यांनी सोमेश्वर देवस्थान जर्णोधार देणगी दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित भाविकांसाठी राजहंस ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने सोमेश्वर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
Comments
Post a Comment