बारामती तालुक्यात १९५ ब्रास गौणखनिज साठ्याच्या विक्रीसाठी निविदा.
बारामती तालुक्यात १९५ ब्रास गौणखनिज साठ्याच्या विक्रीसाठी निविदा
बारामती : बारामती तालुक्यातील होळ-सस्तेवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील साठवण तलावाच्या उत्खननातून निघालेली माती, मुरूम व दगड आदी गौणखनिज साठ्याची विक्री करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक अर्जदारांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात निविदा निवासी नायब तहसिलदार, बारामती यांच्याकडे निविदा सादर कराव्यात असे कळविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, खनिकर्म शाखा, पुणे यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत होळ-सस्तेवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील साठवण तलावाच्या उत्खननातून उपलब्ध झालेला १९५ ब्रास माती, मुरूम व दगड साठा निविदेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
या साठ्यासाठी १ लाख १७ हजार रुपये लघुत्तम किंमत निश्चित करण्यात आली आहे. निविदेसोबत २५ हजार रुपयांचा अनामत रकमेचा धनादेश तहसिलदार, बारामती यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने आधारकार्ड व पॅनकार्डद्वारे ओळखीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.
निविदा सादर करण्याची मुदत संपल्यानंतर त्याच दिवशी लिफाफे उघडण्यात येणार आहेत. मंजूर निविदाधारकास जिल्हा खनिज प्रतिष्ठाणचा १० टक्के निधी, २ टक्के टीडीएस तसेच भूपृष्ठ भाडे लागू राहणार आहे. निविदेची संपूर्ण रक्कम २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत भरणे आवश्यक राहील. इतर अटी व शर्ती संबंधित आदेशामध्ये नमूद करण्यात येतील, असे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कळविले आहे
००००
Comments
Post a Comment