उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर मंदिरात फौजी बांधवांना बांधली राखी

श्रावण महिन्यानिमित्त स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले

सोमेश्वरनगर : (संपादक विनोद गोलांडे)
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध श्री सोमेश्वर मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट देत फौजी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी फौजी बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्रावण महिन्यानिमित्त श्री सोमेश्वर मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी धार्मिक वातावरणात पूजा-अर्चना केली. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती.
फौजी बांधवांना राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम करताना सुनेत्रा पवार यांनी देशसेवेसाठी कार्यरत असलेल्या जवानांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.