श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना निवडणूक : निवृत्ती शेंडकर यांचा तुतारी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल
श्री सोमेश्वर सह. साखर कारखाना निवडणूक : निवृत्ती शेंडकर यांचा तुतारी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करंजेपूल गावचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व, माजी सरपंच तसेच करंजे सोसायटीचे चेअरमन श्री. निवृत्ती शेंडकर (बिंटूआण्णा) यांनी सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम-वाल्हे गटातून निवृत्ती (बिंटूआण्णा) शेंडकर. यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) तुतारी गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्या समर्थकांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेंडकर यांच्या उमेदवारीमुळे करंजेपूल परिसरातील निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला असून, त्यांच्या उमेदवारीकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment