करंजे वि.का. स.सोसायटी चेअरमनपदी राहुल शेंडकर.

करंजे वि.का. स.सोसायटी चेअरमनपदी राहुल शेंडकर
 निवड प्रसंगी उपस्थित सर्व संचालक व सभासद वर्ग.

नवनिर्वचित चेअरमन श्री राहुल निवृत्ती(बिंटू अण्णा ) शेंडकर 

सोमेश्वरनगर प्रतिनिधी (संपादक - विनोद गोलांडे)
करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी राहुल शेंडकर यांची सर्वांनामते बुधवार दिनांक २ सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड झाली. सोमेश्वरनगर करंजेपूल येथील करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना सन १९१८ मध्ये झाली सोमेश्वर पंचक्रोशीतील अनेक गावे आणि शेतकरी या संस्थेची जुनी नाळ जोडलेली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत कर्जवाटप करण्यात येते. त्यामध्ये पीककर्ज १.९० कोटी रुपये, मध्यम मुदतीचे कर्ज २.२५ कोटी रुपये तसेच विविध योजनांतर्गत इतर कर्जांचा समावेश आहे. संस्थेचे भागभांडवल जवळपास १ कोटी रुपये असून, व्यापारी गाळ्यांच्या भाड्यापोटी संस्थेला उत्पन्न मिळते. तसेच संस्थेची कर्जवसुली ८० टक्के आहे.

या प्रसंगी सर्व संचालक व सभासदांनी चेअरमन पदासाठी राहुल शेंडकर यांना एकमताने अनुमोदन दिले. यावेळी करंजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच निवृत्ती उर्फ बिंटू अण्णा शेंडकर, अनिल गायकवाड, साहेबराव गायकवाड, माजी सरपंच वैभव गायकवाड, मावळते चेअरमन महेश शेंडकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र शेंडकर, हनुमंत पांडूरंग शेंडकर,नवनाथ शेडकर ,ज्येष्ठ संचालक शशिभाऊ गायकवाड, शहाजी गुलाबराव गायकवाड, विठ्ठल गायकवाड,तानाजी गायकवाड,रवींद्र गायकवाड तसेच महिला संचालिका शकुंतला गायकवाड आणि श्रीमती कुसुम शेंडकर व संस्थेचे सचिव दीपक शिर्के व सोमनाथ गायकवाड उपस्थित होते.

युवा कार्यकर्ते हरिष गायकवाड, धीरज गायकवाड, तसेच करंजेपुल तंटामुक्ती अध्यक्ष मयूर शेंडकर उपस्थित होते. युवा पिढीतील उमदान नेतृत्व म्हणून पाहिले जाणारे राहुल शेंडकर यांच्या बिनविरोध निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

संस्थे मार्फत अनेक योजना रबावणे व पीक प्रात्यक्षिक पाहणी व मार्गदर्शन शिबीरे राबून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढी च्या दृष्टीने काम करून तात्काळ सुविधा पुरवीने करिता तळागाळात जाऊन काम करण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन यांनी बोलताना व्यक्त केले.
--- नवनिर्वाचित चेअरमन राहुल शेंडकर ---

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.