शिक्षक दिनानिमित्त निक्सा ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शिक्षक दिनाचे औचित्य साधून निक्सा ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप चौधरवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपली मनोगते व भाषणे सादर करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमात नेक्सा ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) औद्योगिक सेल, बारामती तालुका अध्यक्ष निलेश दिलीप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करावी, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेले स्पोर्ट्स ड्रेस निलेश गायकवाड यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमास विद्यमान उपसरपंच प्रमिला पवार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी भापकर, माजी सरपंच संदीप (भैया) चौधरी, नेक्सा ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजर प्रसाद साळुंखे, ग्रामस्थ योगेश चौधरी, पूनम चौधरी, सोनाली शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ, मुख्याध्यापिका सुनीता बालगुडे, शारदा खामकर यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निक्सा ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
Comments
Post a Comment