वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा स्नेहबंध.

महिला पदाधिकाऱ्यांकडून पोलीस बांधवांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त

सोमेश्वरनगर / वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे महिला पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई लडकत तसेच पूजा गणेश जगताप, मीना दशरथ जगताप, शोभा गोरख जगताप, राणी बजरंग जाधव आणि सौ. हेमा गणेश खोडके यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधली.
पोलीस बांधव दिवस-रात्र आपल्या कर्तव्यावर तत्पर राहून समाजाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यावेळी आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
या उपक्रमातून पोलीस आणि नागरिकांमधील आपुलकी, विश्वास व सामाजिक बांधिलकीचा स्नेहबंध अधिक दृढ झाला.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.