पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत काकडे महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास सांघिक विजेतेपद
पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत काकडे महाविद्यालयाच्या मुलींच्या संघास सांघिक विजेतेपद
पुणे/सोमेश्वरनगर- भारतीय जैन संघटना महाविद्यालय वाघोली येथे दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी पार पडलेल्या पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मु .सा. काकडे महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले मुलांच्या संघाने सांघिक उपविजेतेपद मिळवले स्पर्धेतील विजयी खेळाडू मुलीमध्ये काजल जगताप ४८ किलो प्रथम क्रमांक , पोर्णिमा मोटे ५२ किलो द्वितीय क्रमांक, सायली जगताप ५७ किलो प्रथम क्रमांक , समर्था ठोंबरे ५७ किलो व्दितीय क्रमांक , पूर्वा गोरे ६३ किलो द्वितीय क्रमांक मुलांमध्ये प्रथमेश चाबुकस्वार ६० किलो तृतीय क्रमांक , आदित्य पवार ७३ किलो द्वितीय क्रमांक , तानाजी घोरपडे ८१ किलो द्वितीय क्रमांक , जय करचे १०० किलो द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सतीशराव काकडे-देशमुख महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे- देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले व श्रीगोंदा येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूंना प्राचार्यांनी प्राचार्य कक्षात बोलावून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजावून घेऊन खेळाडूंना महाविद्यालयातर्फे जास्तीत जास्त क्रीडा सुविधा देण्याचे आव्हान करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूंना प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे व प्रा. दत्तराज जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment