शाळा, महाविद्यालय परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे– API जीवन मोहिते यांचे आवाहन

शाळा, महाविद्यालय परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे
– API जीवन मोहिते यांचे आवाहन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी (संपादक विनोद गोलांडे)

शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवन होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या मोहिमेला अधिक प्रभावी करण्यासाठी सोमेश्वरनगर परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक व दुकानदारांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी केले.

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेट आदी पदार्थांची विक्री किंवा सेवन केल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे. शाळा व महाविद्यालय परिसरात अशा पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याची माहिती संबंधित पोलीस प्रशासनास द्यावी. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी केले.

“विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सोमेश्वरनगर परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे,” असेही त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.