Posts

Image
बेचाळीस संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण; विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मिळाले व्यासपीठ. सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तब्बल ४२ संशोधन प्रकल्प सादर केले. नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना मिळावी आणि तरुण संशोधकांना आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना व संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या स्पर्धेचा उद्देश होता. स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात चाणक्यनीती व मानवी मूल्यांची सांगड घालत संशोधनाचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा समितीचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. त्यांनी...

‘सेवा संकल्प अभियानातून सेवा, सुशासन आणि लोकसहभागातून ग्रामविकासाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न- गट विकास अधिकारी

Image
'सेवा संकल्प अभियानातून सेवा, सुशासन आणि लोकसहभागातून ग्रामविकासाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न- गट विकास अधिकारी. बारामती :  प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून सेवा, सुशासन आणि लोकसहभागातून ग्रामविकासाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी किशोर माने यांनी कळविली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामपंचायतींचे सक्रिय योगदान आणि पंचायत समितीच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ला बारामती तालुक्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मानवी रांगोळी, आरोग्य शिबिरे, महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती, पोषण मार्गदर्शन, योगसाधना, वृक्षारोपण, शासकीय दाखल्यांचे वाटप, अंगणवाडी उत्सव तसेच श्रमदान आणि लोकसहभाग अशा विविध उपक्रमांतून अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असल्याचेही त्यांनी कळविले आहे. 
Image
ठरावाची होळी करून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा निषेध; शेतकऱ्यांना बाजाराची सुविधा सुरू ठेवण्याची मागणी बारामती : बारामती शहरातील गणेश मार्केट परिसरातील गुरुवारचा आठवडे बाजार बंद करण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयावरून विरोध वाढला आहे. नगरपरिषदेच्या ठरावाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ६२ नुसार गणेश भाजी मंडई व सूर्यनगरी येथील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपलब्ध वृत्तांत नमूद आहे. गुरुवारी भरणाऱ्या बाजारात शेतकरी व विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजार बंद करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी व छोट्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आक्षेप आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संब...

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.

Image
तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश. सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठान्स सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६ मधील कुस्ती स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली तनुष्का शिवाजी भुजबळ, इयत्ता १० वी, १७ वर्षांखालील गटातील ५७ किलोपेक्षा कमी वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले,समृद्धी प्रविण सावंत, १४ वर्षांखालील गटातील ३० किलोपेक्षा कमी वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकाची मानकरी ठरली.या दोन्ही विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २०२६ जिल्हा क्रीडा संकुल, बारामती नुकत्याच झालेल्या  तायक्वांदो स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली यामध्ये तन्मय रेवन्नाथ होळकर, इयत्ता ९ वी, १७ वर्षांखालील गटातील ६८ ते ७३ किलो वजन गटात प्...

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अश्लील हावभाव, बिभस्त नृत्य आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Image
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अश्लील हावभाव, बिभस्त नृत्य आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल सोमेश्वरनगर :  बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत बुधवार दि २३ रोजी ९  च्या सुमारास मतकर वस्ती, माळशिकारेवाडी, कोहाळे बुद्रुक, ता. बारामती येथे श्री साई समर्थ तरुण मंडळ, माळशिकारेवाडी, कोऱ्हाळे  बुद्रुक या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टर क्र. MH 42 Q 2644 व त्यास जोडलेल्या चारचाकी ट्रॉली क्र. MH 42 BS 2120 मध्ये डॉल्बी संगीताच्या तालावर महिला नृत्यांगणांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव,  अंगविक्षेप व बिभस्त नृत्य करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर प्रकारास मंडळाचे पदाधिकारी व संबंधित व्यक्तींकडून प्रोत्साहन देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने मंडळाच्या अध्यक्षांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,2023 चे कलम 168 अन्वये देण्यात आलेल्या नोटीसम...

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

Image
गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार. सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ४ इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस ठाणेकडून सादर करण्यात आलेल्या हद्दपार प्रस्ताव क्र. ०१/२०२५ अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी दिनांक २१/०९/२०२६ रोजी आदेश पारित करून खालील इसमांना २४ महिने (२ वर्षे) कालावधीसाठी संबंधित हद्दीतून हद्दपार केले आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे. 1. वैभव तुकाराम शेलार, वय ३२ वर्षे, रा. नाईकवाडी, मगरवाडी, ता. बारामती, जि. पुणे. 2. किरण मारुती गायकवाड, वय २५ वर्षे, रा. नाईकवाडी, मगरवाडी ता. बारामती, जि. पुणे. 3. अनिकेत प्रदीप काळे, वय २८ वर्षे, रा. देऊळवाडी, करंजे, ता. बारामती, जि. पुणे. 4. अमोल पोपट गायकवाड, वय ३४ वर्षे, रा. गायकवाडवस्ती, मगरवाडी ता. बारामती, जि. पुणे. सदर इसमांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अभिलेखाचा विचार करून तसेच सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही कारवाई ...

सोमेश्वरनगर ! सोमेश्वरने स्विकारला राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार

Image
सोमेश्वरनगर ! सोमेश्वरने स्विकारला राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार सोमेश्वरनगर प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि.नवी दिल्ली या संस्थेचा सन २०२४-२०२५ चा देशपातळीवरील ‘तांत्रिक कार्यक्षमतेचा’ तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दिनांक २२/०९/२०२६ रोजी केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. सदर कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री कृष्ण पाल (गुर्जर), महाराष्ट्राचे सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील, माजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री तथा राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच झारखंड, गुजरात, पंजाब या राज्यांचे सहकार मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते. देशभरातील सहकारी साखर कारखान्यांना नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर नारायण नायकवडे व ची...