‘सेवा संकल्प अभियानातून सेवा, सुशासन आणि लोकसहभागातून ग्रामविकासाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न- गट विकास अधिकारी


'सेवा संकल्प अभियानातून सेवा, सुशासन आणि लोकसहभागातून ग्रामविकासाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न- गट विकास अधिकारी.

बारामती :  प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या माध्यमातून सेवा, सुशासन आणि लोकसहभागातून ग्रामविकासाचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी किशोर माने यांनी कळविली आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामपंचायतींचे सक्रिय योगदान आणि पंचायत समितीच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामुळे ‘सेवा संकल्प अभियान’ला बारामती तालुक्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे.


मानवी रांगोळी, आरोग्य शिबिरे, महिला आरोग्य व स्वच्छता जनजागृती, पोषण मार्गदर्शन, योगसाधना, वृक्षारोपण, शासकीय दाखल्यांचे वाटप, अंगणवाडी उत्सव तसेच श्रमदान आणि लोकसहभाग अशा विविध उपक्रमांतून अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असल्याचेही त्यांनी कळविले आहे. 

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.