पाणीपुरवठा विहिरीवरील विद्युत केबल चोरीचा प्रयत्न; करंजे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत

पाणीपुरवठा विहिरीवरील विद्युत केबल चोरीचा प्रयत्न; करंजे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत.

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबूत परिसरात काही दिवसांपूर्वी तीन शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरीची घटना घडलेली असतानाच आता करंजे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीवरील विद्युत केबल चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी विद्युत केबल कट करून ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र केबल विहिरीत पडल्याने काही प्रमाणात हाताला आलेली केबल नेली तर काही हाताला न आल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
या घटनेमुळे करंजे गावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेवरील विद्युत केबल चोरीचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
निंबूतमधील केबल चोरीनंतर आता करंजे येथेही अशी घटना घडल्याने परिसरातील केबल चोरीचे प्रकार थांबण्याची गरज निर्माण झाली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या विद्युत साधनांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करंजे सरपंच भाऊसो हुंबरे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.