"पार्वती भजनी मंडळ" वतीने गणेशोत्सवनिमित्त विविध ठिकाणी अथर्वशीर्ष पठण, भजन व कीर्तनामुळे भक्तमय वातावरण.
सोमेश्वरनगर : गणेशोत्सवानिमित्त घराघरात गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घरांची आकर्षक सजावट करत भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पार्वती भजनी मंडळ करंजे यांनी विविध ठिकाणी गणेश मंडळ व भजनी मंडळातील प्रत्येक घरी अथर्वशीर्ष पठण, भजन, कीर्तन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन भजनी मंडळातील सर्व महिला वर्ग एकत्र येत करण्यात येते. सकाळ-संध्याकाळ गणरायाची आरती, पूजा आणि नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला आहे.
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असून,“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून जात आहे. घराघरात गणरायाच्या आगमनामुळे आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Comments
Post a Comment